Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जिल्हा परिषद मोहोली येथील ११वी १२वीची (कला ,विज्ञान) शाखा दिलेली परवानगी रद्द

जिल्हा परिषद मोहोली येथील ११वी १२वीची (कला ,विज्ञान) शाखा दिलेली परवानगी रद्द

जिल्हा परिषद मोहोली येथील ११वी १२वीची (कला ,विज्ञान) शाखा दिलेली परवानगी रद्द
X

"शिक्षण उपसंचालक याचे आदेश."

म-मराठी न्यूज नेटवर्क

दिवाकर भोयर

धानोरा प्रतिनिधी

मो.9421660523

धानोरा :- जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सुरू असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल मोहली तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांनी त्याचे माध्यमिक विद्यालय मध्ये ११ वी व १२वी (कला विज्ञान) शाखा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाच्या आदेशानुसार जि. प. हाँयस्कूल मोहलि माध्यमिक शाळेत सन 2020 -21 पासून ११व १२वि चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे .सदर परवानगी ही मा.शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिली . दिनांक 18 जुलै 2009नुसार स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद यांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू असल्यास तेथे अथवा स्वतंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्वतःच्या उत्पन्नातून व राज्य शासनावर कोणती आर्थिक दायित्व न देता सुरू करू इच्छित असतील तर यापुढे राज्य शासनावर कोणतेही आर्थिक भार पाडता येणार नाही .या अटीच्या अधीन राहून यापूर्वी संचालनालयास सादर केलेल्या प्रस्तावामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय यांना इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देता येईल असे कार्यालयास कळवले होते. सदर प्रञा नुसार जिल्हा परिषद हायस्कूल मोहलि ता. धानोरा जिल्हा गडचिरोली या माध्यमिक शाळेत सन 2020 -21 पासून अकरावी व बारावी कला व विज्ञान शाखा स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरू करण्यास या कार्यालयाने परवानगी दिलेली होती .तथापि माननीय शिक्षण संचालक पुणे यांच्या आदेशामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल मोहलि तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांचे नाव नसल्यामुळे व जिल्हा परिषद हायस्कूल मोहलि तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांच्या इयत्ता ११ व १२वि कला विज्ञान शाखा सुरु करण्यास परवानगी मिळण्याबाबत चा प्रस्ताव संचालनालय/शासनाला सादरच झालेला नसल्याने शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग नागपूर यांनी दिनांक २४/०८/२०२०अन्वये रद्द करन्यात आल्याचे मा.शिक्षणाधिकारी (माध्य)जिल्हा परिषद गडचिरोली यांना कळविले आहे.

जिल्हा परिषद हायस्कूल मोहाली येथे अकरावी कला विज्ञान शाखेत सन 2020-2021 या शैक्षणिक सत्रात प्रवेश झालेल्या असल्यास सदर प्रवेश नजीकच्या मान्यताप्राप्त शाळेत समायोजित करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच जिल्हा परिषद हायस्कूल यांना विज्ञान शाखा व कला शाखा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव संचालनालयास सादर करण्याकरिता नियमानुसार आवश्यक ती तपासणी करून तसेच शासन पत्र दिनांक 25 .1. 2019 नुसार आवश्यक ती तपासणी शुल्काची रक्कम चलनाद्वारे भरणाकरून ,चलनाची प्रत दिनांक २५/०१/२०१९नुसारआवशक ती तपासनी शुल्काची रक्कम चलनाद्वारे भरुण चलनाची प्रत तसेच आपल्या अभिप्राय / शिफारशीसह प्रस्ताव तात्काळ कार्यालयात सादर करावा अशा पद्धतीचे आदेश अनिल पारधी शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांना कळवले आहे.

Updated : 26 Oct 2020 12:06 PM GMT
Next Story
Share it
Top