जिल्हाधिकारी यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
M Marathi News Network | 27 Oct 2020 7:56 PM GMT
X
X
लातूर:प्रतिनिधी
सुजय लांडगे
शासकीय कामात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी सामाजिक कार्यातही मागे नसल्याचे आज लातुरात दिसून आले.
लातूर जिल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या पत्नी सोनम यांचा आज (मंगळवार) ३३वा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने शहरातही राजीव गांधी चौक ते कण्हेर रस्ता या दरम्यान ३३ नवीन ड्रम घेऊन या ड्रममध्ये शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत. या कामी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे मोलाचे सहकार्य झाले आहे.या प्रसंगी जी.श्रीकांत यांनी प्रत्येकाने जमेल तसे वाढदिवसाच्या निमित्ताने एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.
या प्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वयक पवन लड्डा, नगरसेवक भीमरान सय्यद, रणजीपटू आशिष सूर्यवंशी, पूजा निचडे आदींनी परिश्रम घेतले.
Updated : 27 Oct 2020 7:56 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire