Home > विदर्भ > जिद्द आणि आत्मविश्वासा च्या बळावर ९१.४० टक्के गुण मिळाले..

जिद्द आणि आत्मविश्वासा च्या बळावर ९१.४० टक्के गुण मिळाले..

जिद्द आणि आत्मविश्वासा च्या बळावर ९१.४० टक्के गुण मिळाले..
X

म मराठी

पुसद प्रतिनिधी फिरोज खान

पुसद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा तर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षाचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. या मध्ये पुसद ची गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय चा विद्यार्थी शेख फिरोज शेख इस्माईल यांनी कोणत्याच प्रकारची खाजगी शिकवणी न लावताही ९१.४० % गुण मिळवून गगन भरारी घेतली आणि त्याचे वडील रिक्षा चालक आणि आई गृहिणी आहे शेख फिरोज यांची परिस्थिती बिकट असूनही त्यांनी यश प्राप्त केला आहे आई-वडिलांचे कोणतेही मार्ग दर्शन नसताना शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकांचे नियोजन या सगळ्या बाबी चा अवलंब करती दररोज चिकाटीने अभ्यास करीत घवघवित यश प्राप्त केले. भविष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी जिद्द असेल तर कोणतीही परीक्षा कठीण नाही.विद्यार्थ्यांनी टी.व्ही.,मोबाईल पासून स्वतःला अलिप्त ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने.यश हमखास मिळतेच असा मनोदय व्यक्त करीत अशिक्षित आई वडिलांचे स्वप्न साकार करणार असल्याची ग्वाही शेख फिरोज ने दिली .त्याचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ३ वसंत नगर, पुसद येथे झाली आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश मिळवणाऱ्या त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आप्त स्वकिय ,मित्र ,सर्वशिक्षक यांचे कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Updated : 3 Aug 2020 11:15 AM GMT
Next Story
Share it
Top