Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर व पोलिस अँकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न

जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर व पोलिस अँकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न

जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर व पोलिस अँकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न
X

"जिजाऊ संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर व पोलिस अँकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न"

म मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा,प्रतिनिधी/संजय लांडगे

पालघर :- तालुक्यातील कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबीर व जिजाऊ पोलिस अँकॅडमीचे उद्घाटन नॅशनल इंग्लिश स्कूलचे संस्थापक मुस्तफा मेमन, जिजाऊ महिला प्रमुख मोनिका पालवे, कुडूस ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर पोलिस भरती प्रशिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी उद्घाटन झाल्यानंतर आपले कौशल्य दाखवले.

जास्तीत जास्त मुलांनी या प्रशिक्षण केंद्राचा मोफत फायदा घेऊन आपल्याकडील जास्तीत जास्त मुले पोलिस झाले पाहिजेत असा सल्ला जिजाऊ संस्थेच्या महिला प्रमुख मोनिका पालवे यांनी दिला. तर आपल्या परिसरातील मुले पुढे जाण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत तत्पर असून सर्व सहकार्य करण्यास आम्ही सक्षम आहोत म्हणून जास्तीत जास्त मुलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन नॅशनल इंग्लिश स्कूल चे संस्थापक मुस्तफा मेमन यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी कुडूसचे माजी उपसरपंच इरफान सुसे, जि. प.सदस्य शशिकांत पाटील, जिजाऊ चे सल्लागार डॉ.गिरीश चौधरी, धीरज सांबरे, गणेश सांबरे तसेच परिसरातील जिजाऊ चे पदाधिकारी आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Updated : 26 Oct 2020 2:00 AM GMT
Next Story
Share it
Top