Home > महाराष्ट्र राज्य > जाळण्यासाठी सर्पान आणले त्यालाही फुटली पालवी

जाळण्यासाठी सर्पान आणले त्यालाही फुटली पालवी

जाळण्यासाठी सर्पान आणले त्यालाही फुटली पालवी
X

ग्रामीण भागातील मुलं ऑनलाइन शिक्षणापासून दूर

के.के.रिपोटर रिसोड

ग्रामीण भागातील मुलं ऑनलाइन शिक्षणापासून दूर राज्यातील शाळा जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत . तोपर्यंत डिजिटल माध्यमांतून शिक्षण देण्यात येत आहे . त्यासाठी मोबाईल , लॅपटॉप , संगणक किंवा इंटरनेट यांची आवश्यकता आहे . शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जाणारे 18 टक्के विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून दूर आहेत . एकूण 65 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही , त्यामुळे त्यांना शिक्षण देणे अवघड आहे.

कोरोणाचा कहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे देशासह ग्रामीण व शहरी भागातही कोरोणा बाधीतांची संख्या ही दिवसेंदिवस वाढुन काळजाचा ठोका वाढवत आहे

याच प्रसंगी नव्या शैक्षणिक वर्षाची ऑनलाइन शैक्षणिक प्रणाली गतिमान होताना दिसत आहे त्यात विद्यार्थी, शिक्षकांसह पालक देखील भरडले जात आहेत.

ऑनलाइन शिक्षण पद्धती साठी अँड्रॉइड मोबाईल आवश्यक आहे परंतु ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या सामान्य परिस्थितीत जगणाऱ्या अनेक पालकांकडे आजही अँड्रॉइड मोबाईल नाहीत ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे जीवन हे हात मजुरीवर अवलंबून असते.

आजच्या या कोरोणा महामारी च्या संकटकाळात अनेकांचे रोजगार व्यवसाय बंद पडले आहेत अशा परिस्थितीत अनेक पालकांची परिस्थिती बिकट झाली असून परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न काहींना पडला आहे.

अशा या संकट काळात हातावर पोट असणाऱ्या पालकांची अँड्रॉइड मोबाईल खरेदीची क्षमता काय असणार? अशा परिस्थितीत अँड्रॉइड मोबाईल साठी मुलांनी देखील आपल्या पालकांकडे हट्ट धरला असून या ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांपुढे मोठा पेच निर्माण झाला असुन हा पेच पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसून येत आहे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा विचार केला तर बहुतांश भागात मोबाईल रेंज मिळत नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यां पर्यंत ही प्रणाली पोहोचणे शक्य नाही काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत परंतु त्या पालकांची स्वतःचीच कामे जास्त असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी आपला मोबाईल पाल्यांना देणे शक्य होत नाही तसेच अनेक पालकांना दिवसभर अँड्रॉइड मोबाईल मुलांकडे असावा ही संकल्पनाच मान्य नाही तसेच एकाच घरातील दोन ते तीन मुले शिक्षण घेत आहेत अशा परिस्थितीत पालक आपल्या प्रत्येक मुलास अँड्रॉइड मोबाइल कोठुन उपलब्ध करून देणार शिवाय दर महिन्याला नेटचे बॅलन्ससाठी पैसे कोठून आणणार हा पेच देखील पालकांची डोकेदुखी ठरतांना दिसून येत आहे अलीकडे व्हाट्सअप वर ग्रुप तयार करून त्यावर अभ्यासक्रम शिकण्याचे काम सुरू झाले आहे मात्र त्यास एवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती ही कायम आहे.

त्यामुळे आपल्या पाल्यांचा अभ्यास कसा पूर्ण करावा यावरून पालक चिंतातुर झाले असून गोंधळलेल्या स्थितीत आहेत

सध्याच्या कोरोणा महामारी च्या संकटकाळात लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे रोजगार बंद झाला आहे त्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे अशा परिस्थितीत मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल कोठून उपलब्ध करून द्यायचा दर महिन्याला नेटचे बॅलन्स साठी पैसे कोठून आणायचे सध्यस्थितीत ऊधार उसनवारीने देखील कोणी पैसे देत नाही.

Updated : 19 Jun 2020 10:23 AM GMT
Next Story
Share it
Top