Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जाफ्राबाद गावातील रस्त्यांची दुरावस्था : रस्त्यावरील चिखलामुळे आरोग्याला धोका : ग्राम पंचायत प्रामुख्याने दुर्लक्ष.

जाफ्राबाद गावातील रस्त्यांची दुरावस्था : रस्त्यावरील चिखलामुळे आरोग्याला धोका : ग्राम पंचायत प्रामुख्याने दुर्लक्ष.

जाफ्राबाद गावातील रस्त्यांची दुरावस्था : रस्त्यावरील चिखलामुळे आरोग्याला धोका : ग्राम पंचायत प्रामुख्याने दुर्लक्ष.
X

साईनाथ दुर्गम

ग्रामीण प्रतिनिधी टेकडा ताला

7709049186

जाफ्राबाद :- जाफ्राबाद गावामध्ये अनेक रस्ते पक्के नाहीत येथील रस्ते दयनीय अवस्थेत आहेत या रस्तावर सर्वत्र चिखल पसरलेला असून या चिखलाचा रस्त्यामध्ये वाट काढावी लागत आहे आणि चिखलाच्या अडचणींनी रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे कच्चा मातीचा रस्ता असून आता पावसाळा त्यावर पाणी साचून चिखल होत आहे आणी काही ठिकानी मोटे खड्डे पडुन ,मुत्ताय्या अल्लुरी, शंकर दुर्गम याचा घराकडे जान्यासाठी बरोबर रस्ताच नाही या मात्र ग्राम पंचायत प्रशासन,यांचे दुर्लक्षित पणामुळे गावातील नागरीकांना नरकवास सहन करावा लागत आहे.

एकीकडे करोना संसर्गाचा महामारी सुरू असताना भयभीत निर्माण झालेली जनता आता या चिखलाची साम्राज्यातून कशी करणार हा मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे गावातील अनेक छोटे-मोठे आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मच्छर यांचे प्रमाण वाढून डेंगू मलेरिया यासारखी रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाळा सुरू होऊन दोन ते तीन महिना होऊन गेले पण आत्तापर्यंत गावातील विहिरीत टाकण्यात येणारे ब्लिचिंग पावडर आतापर्यंत टाकलेली नसून गावकऱ्यांना विहिरीतील पाणी शुद्ध नसल्यामुळे त्या पाण्यामुळे गावातील लोकांना अनेक रोगराईच्या सामना करावा लागत आहे.

गावातील नागरीकानी घरा बाहेर पडणे कठीन झाले आहे रात्रीचा वेळी येणे म्हणजे जीव मुठीत धरून यावा लागत आहे काही ठिकाणी वीजतार एकदम डिले आहेत एक वीजतार दुसऱ्या वीजतारला लागुन तुठण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक आहे.

गावातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसापासून ग्रामीण जनता या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. भारतास स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही.

ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर या समस्याची सोठवणुक करावी म्हणुन गावातील नागरिकांनी आशा व्यक्त करत आहेत.

Updated : 8 Sep 2020 9:25 AM GMT
Next Story
Share it
Top