"जानपल्ली येथे शिबिराचे आयोजन"
X
"जानपल्ली येथे शिबिराचे आयोजन"
म-मराठी न्यूज नेटवर्क
दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी
मो. 9421660523
गडचिरोली/सिरोंचां :- सिरोंचा तालुक्यातील जानपल्ली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावातील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण १६ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला.
दारू सोडण्याची इच्छा असणा-या १७ रुग्णांनी शिबिरात नोंदणी केली. दरम्यान १६ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात,धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. यावेळी शिबीर संयोजक पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका चमूने केले तर यशस्वीतेसाठी गाव संघटन व गावक-यांनी सहकार्य केले.