Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जागर स्त्रीशक्तीचा.. नवरात्रोत्सवातील ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण

जागर स्त्रीशक्तीचा.. नवरात्रोत्सवातील ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण

जागर स्त्रीशक्तीचा.. नवरात्रोत्सवातील ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण
X

स्वप्नील गोलेटिवार

अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी

मो. ८३९०८७९१५२

  • राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचा अभिनव उपक्रम*

अहेरी:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस गडचिरोली तर्फे *जागर स्त्रीशक्तीचा* या आशयाखाली नवरात्र उत्सव 2020 मध्ये विविध ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले.

डिजिटल नवरात्र उत्सवात विविध प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध नैवेद्य सादरीकरण प्रसाद सजावट स्पर्धा, विविध दैवी रूपांचे सादरीकरण वेशभूषा स्पर्धा, तसेच तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेल्या दक्षिण गडचिरोलीत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण बतकम्मा. या सणानिमित्त भव्य ऑनलाईन बतकम्मा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध गटांनी 25 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रवादी महिला काँग्रेस तथा युवती काँग्रेसच्या सदस्याकडे फोटो आणि चित्रीकरण पाठविले होते.

नुकतेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक भेट वस्तू देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.यामध्ये देवी समोर प्रसाद (नैवेध्य) सजावट स्पर्धेत सौ.स्वाती जैनवार यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले,सौ अर्चना मरसकोल्हे द्वितीय आणि सौ.मीना बीरेल्लीवार तृतीय पारितोषिक पटकाविले.

देवी रूप सजावट स्पर्धेत अहेरी येथून गुंजन सडमेक प्रथम,अनवी भटपल्लीवार द्वितीय आणि गडचिरोली वरून वैष्णवी तिगरे यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.

बतकम्मा स्पर्धे (सोलो) स्पर्धेत सिरोंचा येथील वनिता तोकला प्रथम,सिरोंचा येथील कविता पिडगूवार द्वितीय,अहेरी येथील मायाताई बिटपल्लीवार तृतीय पारितोषिक पटकाविले. तर ग्रुप मधून आसरअली येथील गंपा समय्या ग्रुपने प्रथम,अहेरी येथील कृष्णा ग्रुपने द्वितीय आणि रायगट्टा येथील अंबिलपवार ग्रुप ने तृतीय पारितोषिक पटकाविले.

या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम,राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पूर्वा दोन्तूलवार,तालुका अध्यक्ष शोभा मडावी,शहर अध्यक्ष ममता पटवर्धन,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार आणि आदी राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 2 Nov 2020 4:31 AM GMT
Next Story
Share it
Top