जांब येथील जुगारावरील धाड प्रकरणी ग्रामीण पोलीसांवरील कारवाई गुलदस्त्यात?
X
जांब येथील जुगारावरील धाड प्रकरणी ग्रामीण पोलीसांवरील कारवाई गुलदस्त्यात?
यवतमाळ- यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जांब शिवारातील एका शेतामध्ये तीन पत्तीचा जुगार सुरू असल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात कारवाई करण्यातकरीता येथे ग्रामीण पो.स्टे.च्या एका पथकाने येथे धाड मारली. परंतु या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत बरीच चर्चा पोलीस वर्तुळात झाली. यावेळी घटनास्थळी हस्तगत केलेली 24 लाखांच्या वर असलेली रक्कम कागदोपत्री केवळ 24 हजार रूपये दाखविण्यात आली. अन्य रक्कम पथकातील कर्मचारींनी वाटून घेतल्याची विश्वसनिय माहिती आहे. परंतु रक्कम वाटपावरून पथकातील पोलिसांमध्येच तु तु मै मै झाल्याने सगळे पितळ उघडे पडले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबधीत ठाणेदाराकडून झाला मात्र यात ते यशस्वी झाले नाही. काही असंतुष्ट सहकारींनीच हे प्रकरण जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयापर्यंत पोहचविले. एवढेच नाही तर या कारवाईबाबत व्हीडीओ क्लीप, ऑडीओ क्लीपसुध्दा सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे ग्रामीण पोलीसांबाबत तीव्र नाराजी सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दोषींवर काय कारवाई केली हे जाहिर करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.