Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > जमियत उलमा ए हिंद संघटनेच्या पालम तालुकाध्यक्षपदी गौसोद्दिन भाई शेख यांची निवड

जमियत उलमा ए हिंद संघटनेच्या पालम तालुकाध्यक्षपदी गौसोद्दिन भाई शेख यांची निवड

जमियत उलमा ए हिंद संघटनेच्या पालम तालुकाध्यक्षपदी गौसोद्दिन भाई शेख यांची निवड
X

आरूणा शर्मा

संपूर्ण भारतात समाजकार्या साठी लोकप्रिय असलेली जमियत उलमा ए हिंद (अर्शद मदनी) या संघटनेची बैठक परभणी येथील जमियात उलमा ए हिंद संघटनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालम तालुक्यात जमियात उलमा ई हिंदची नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. जमियत उलमा ए हिंद अर्शद मदनी संघटनेचे पालम तालुका अध्यक्ष म्हणून पालम येथील प्रसिद्ध समाजसेवक पालम सिटीजन्सचे संपादक गौसोद्दीन शहाबोद्दीन भाई शेख यांची निवड करण्यात आली. तर पालम तालुका सचिव म्हणून हाफेज आसिफ भाई कुरेशी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.पालम शहर व तालुक्यात समाजकार्यासाठी,लोकांच्या हितासाठी,लोकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे मनोगत यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गौसोद्दिन भाई शेख यांनी व्यक्त केले.यावेळी मराठवाडा अध्यक्ष मौलाना कलीम बेग नदवी,परभणी जिल्हा अध्यक्ष खारी रशिद साहब,मौलाना इसा खान हाश्मी, मौलाना नसरुल्ला हुसेन, मौलाना एजाज खान, हाफेज सय्यद अफसर मीनहाजी, हाफेज उबेद, मौलाना इलियास पटेल नदवी, हाफिस इसा साहब, तर पालम शहरातील मौलाना उबेद साहब शेख, मौलाना मुखिद भाई कुरेशी,सह आदींची उपस्थिती होती

Updated : 3 Nov 2020 7:01 PM GMT
Next Story
Share it
Top