Home > विदर्भ > जनावरावरील लम्पी स्कीन रोगावर आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य शिबीर

जनावरावरील लम्पी स्कीन रोगावर आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य शिबीर

जनावरावरील लम्पी स्कीन रोगावर आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य शिबीर
X

चिमूर / प्रतिनिधी जावेद पठाण

चिमूर :- विधानसभेत गाय वर्णीय जनावरात पसरत असलेल्या लम्पी स्कीन रोगामुळे शेतकरी त्रस्त आहेत.एेन हंगामाच्या वेळेवर लम्पी स्कीन या रोगाचा गाय, बैल या जनावरांवर प्रादूर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ही अडचन ओळखून आम आदमी पार्टी चे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथे जनावरांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. आसपासच्या खेडयातील अनेक बाधित जनावरांची तपासणी करून औषःध उपचार करण्यात आला या आरोग्य शिबिरासाठी पशुवैधकिय तज्ञ डॉ. येलमुले यांचा त्यांनी दिलेल्या सेवेसाठी आम आदमी पार्टी तर्फे सन्मान करण्यात आला.

जनावरावरील लम्पी स्कीन रोगावरील आरोग्य शिबिरासाठी आम आदमी पार्टी चे आदित्य पिसे, मंगेश शेंडे, विशाल इंदोरकर, सुशांत इंदोरकर, कैलास भोयर, मंगेश वांढरे, त्रिलोक बघमारे, नरेश बुटके, संजय बहादुरे, विशाल बारस्कर, लीलाधार लिचडे व इतर सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ सुखदेवजी तिजारे, बाबाराव उताणे, प्रकाश भोयर, मानेकरावजी निखारे, संजय उताणे, अमोल भोयर, दादाजी सातपुते यांनी अथक परिश्रम घेतले.

Updated : 8 Sep 2020 9:28 AM GMT
Next Story
Share it
Top