Home > विदर्भ > चिखलागड गावात घाणीचे साम्राज्य,रोगराईची शक्यता

चिखलागड गावात घाणीचे साम्राज्य,रोगराईची शक्यता

चिखलागड गावात घाणीचे साम्राज्य,रोगराईची शक्यता
X

चिखलागड गावात घाणीचे साम्राज्य,रोगराईची शक्यता

प्रतिनिधी/फुलचंद भगत

वाशिम/मंगरुळपीर :- तालुक्यातील ग्रा म पंचायत चिखलागड येथील गावात असलेल्या भूमिगत नाल्या 2 महिन्या पासून बंद आहे, येथील ग्रामसेवक यांना विचारणा केली असता,,सरपंच करू देत नाही असे सांगून टाळाटाळ करत असल्याचे गावकरी सांगत असुन या गटारीमुळे गावातील जनता त्रस्त अाहे तसेच रोगराईची दाट शक्यता असल्याने वरिष्ठांनी लक्ष देवून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

चिखलागड हे गाव आता घाणीच्या विळख्यात सापडले असुन गटारी साचल्याने दिवाळी निमित्य गावात येणाऱ्या लेकीबाईचे स्वागत सांडपाणी व गटाराच्या उघड्या पाण्याने होत आहे. उघड्या सांडपाण्याचं गाव म्हणून चिखलागड नाव लौकिक पंचक्रोशीत होत आहे. कोरोना परिस्थिती जर गावातील जनतेला जर या गटार पाण्याने कोरोना किंवा इतर सदृश्य आजाराची लग्न झाल्यास ही जबाबदारी ग्राम पंचायत ची राहील असा ग्रामस्थामधुन आक्रोश होत आहे.ग्रा पं चे सचिव गावात मिटिंग शिवाय गावात कधीच येत नसून परिणामी विकास साधता येत नाही अशी प्रतिक्रिया गावकर्‍यांमधुन ऊमटत आहे त्यामुळे अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई करून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी,अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही व याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे गावकरी बोलत आहेत. ग्रामस्थांना कराबाबत विचारणा केली असता आम्ही टॅक्स भरण्यासाठी तयार असून आम्हाला आता पर्यंत कोणतीही डिमांड किंवा मागणी लेख ग्रा पं ने दिली नाही,,त्यामुळे प्रशासनाप्रति नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थ तीव्र आनंदोलन करतील असे दिसते.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 20 Nov 2020 5:21 PM GMT
Next Story
Share it
Top