Home > विदर्भ > चायनिज मांजा गळ्यात अडकल्याने एक जखमी

चायनिज मांजा गळ्यात अडकल्याने एक जखमी

चायनिज मांजा गळ्यात अडकल्याने एक जखमी
X

यवतमाळ - दुचाकीवरुन जात असतांना अचानक चायनिज मांजा गळ्यात अडकून मेडीकल व्यावसायीक जखमी झाला.ही घटना १६ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता येथील पांढरकवडा मार्गावरील सिध्देश्वर नगरात घडली. अप्सर परवेझ मोहम्मद हनिफ (४१) रा. रचना लेआउट, सिध्देश्वर नगर असे चायनिज मांजाने गळा कापून जखमी झालेल्या मेडीकल व्यावसायीकाचे नाव आहे.

ते आपल्या दोन मुलांना सोबत घेवून दुचाकीने पांढरकवडा मार्गावरुन रचना लेआउट येथील घराकडे जात होते. दरम्यान सिध्देश्वर नगर परिसरात अचानक चायनिज मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. दुचाकी वेगात असल्याने त्या मांजाने त्यांचा गळा खोलवर कापल्या गेला. गळा कापल्या जात असतांना त्यांनी प्रसंगवधान राखून दुचाकी नियंत्रीत केली. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अप्सर परवेझ यांना तत्काळ रुग्णालयात नेले. उपचारानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. मात्र पतंग उडविणाèया आरोपीची ओळख न पटल्याने गुन्हा दाखल करण्यात तांत्रीक अडचण निर्माण झाली. मेडीकल व्यावसायीक अप्सर परवेझ यांनी उपचारानंतर घटनेची माहिती थेट जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांना दिली. त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेत तत्काळ स्थानिक पोलिसांना ध्वनीक्षेपकावरुन चायनिज मांजाद्वारे पतंग उडविणाèयांना तंबी देण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोलीस पथकांनी संबधित परिसर गाठून पोलीस वाहनातील ध्वनीक्षेपकावरुन अनेकांना समज दिली.

Updated : 18 Sep 2020 3:59 AM GMT
Next Story
Share it
Top