Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > चांदाळा ते कुंभी मार्गावरील पोटफोडी नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे

चांदाळा ते कुंभी मार्गावरील पोटफोडी नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना गावकऱ्यांचे निवेदन

दरवर्षी पावसाळ्यात किमान ५० दिवस कुंभी या गावाचा अन्य गावांशी तुटतो

लहान मुले, मोठी माणसे, जनावरे या लहान पुलावरील पाण्यामुळे पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये संताप

राहुल येनप्रेडीवार,चामोर्शी,

तालुका प्रतिनिधी मो‌. 8888013008

गडचिरोली :- चांदाळा ते कुंभी मार्गावरील पोटफोडी नदीवर उंच पुल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात लहान मुले व मोठी माणसे, बैल जोड्या, या लहान पुलामुळे पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक दुःखद घटना घडल्या आहेत त्यामुळे या नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी गावकऱ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांना निवेनाद्वारे केली आहे..

या ठिकाणी कमी उंचीचा पूल असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात किमान ५० दिवस कुंभी या गावाचा अन्य गावांशी तुटतो. मागील वर्षी हेमंत केशव निकुरे नावाचा ९ वर्षीय बालक पुराच्या पाण्यात याच पुलावरून वाहून गेला. परंतु त्याला अजून पर्यंत कोणते प्रकारचे नुकसान भरपाई मिळाली नाही. यापूर्वी चांदाळा येथील पेंदाम यांचा मुलगा या कमी उंचीच्या पुलामुळे वाहून गेला. अनेकदा शेतकऱ्यांच्या बैलजोड्या, वाहने या पुलावरून वाहून गेले. परंतु गावकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत देखील मिळाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .करिता या ठिकाणी उंच पूलाचे बांधकाम तातडीने करावे अशी मागणी चांदाळा कुंभी येथील रामदासजी सुरपाम ,मोरेश्वर नैताम, ओमेश्वर सोनुले, यादवजी नैताम यांचेसह उपस्थित गावकऱ्यांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी उपस्थित धानोरातालुका प्रभारी संपर्कप्रमुख अनिल भाऊ पोहनकर व चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख....

Updated : 24 Oct 2020 5:30 PM GMT
Next Story
Share it
Top