Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > चळवळीतली जिवंत माणसे !

चळवळीतली जिवंत माणसे !

चळवळीतली जिवंत माणसे !
X

भाग 2: लेखक : श्री.तानाजी सखाराम कांबळे.

...............................................................

मोबाईल नंबर : 80 80 53 29 37

ई-मेल- TanajiKamble33@gmail.com

..................................................................

तो काळ त्यावेळी टोल आंदोलनाचा होता.एका बाजूला, कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या माथी मारलेला आघाडी सरकारने टोल,दुसऱ्या बाजूला आक्रमक झालेली टोल विरोधी कृती समिती, पोलिस जिल्हा प्रशासनाने त्यावेळी आयआरबीला टोल नाक्यावर विविध ठिकाणी पुरवलेले संरक्षण, यामुळे कोल्हापूरचा टोल, लोक विरोधाचा टोला खाण्यासाठी, सज्ज झाले होते. कोल्हापूरच्या टोलला शेवटचा टोला देण्यासाठी टोलविरोधी कृती निमंत्रक, समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष श्री सुभाष वैजू देसाई यांनी, कोल्हापूर संस्थान चे श्रीमंत, छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन, टोल आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आग्रह धरला होता व श्री देसाई यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या अनेक, समिती सदस्यांच्या मागणीला, मान देऊन त्यावेळी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी, कोल्हापूरच्या कावळा नाक्यापासून ते तावडे हॉटेल कडे जाणाऱ्या रोड च्या मध्यभागी असणाऱ्या आय आर बी टोल नाक्या कडे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह हजारो लोकांनी आक्रमकपणे आगेकूच केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार, श्रीमती ज्योतिप्रिया सिंग यांच्याकडे होता.

कोल्हापूर शहरामध्ये टोल'ला पोलीस संरक्षण पुरवल्याबद्दल, अगोदरच त्यांच्याविषयी लोक भावनेमध्ये अनादर होता. त्यातच त्यांनी टोल विरोधी कृती समितीच्या जमावाला, पांगवणे संदर्भात पोलिस प्रशासनातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या वरती दबाव टाकायला चालू केले होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेकांनी कावळ्या नाक्यापासून हजारो लोकांसोबत, आय आर बी टोल कडे चाल केली होती. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या बरोबर, तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आप्पासाहेब धुळाज, टोल विरोधी कृती समिती चे, सर्व सदस्य, ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, या सर्व घटनेचे वृत्तांकन करणारे सकाळ'चे मुख्य बातमीदार श्री सुधाकर काशीद, पत्रकार तानाजी कांबळे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे, अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे संपादक तथा छायाचित्रकार, कोल्हापूर शहरचे डीवायएसपी विठ्ठल पवार,शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत केडगे, यांच्यासह पोलीस दलातील निम्न वर्गाच्या अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंग अगदी बाका आणि गंभीर असा होता. जमाव जास्तीत जास्त चिडलेला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग या वारंवार डीवायएसपी विठ्ठल पवार यांना, जमाव पांगवण्यासाठी, लाठीचार्ज वा वेळ पडल्यास शूट अंड साईट करा अशा पद्धतीच्या वरती सूचना करत होत्या. तत्कालीन डीवायएसपी विठ्ठल पवार यांना,पोलीस अधीक्षक सिंग यांचे वारंवार फोन आल्यावर ती हाथ थरथर कापत होते. वारंवार फोन करून सूचना देणाऱ्या पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या सूचनेला वैतागून शेवटी, तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी श्री आप्पासाहेब धुळाज यांच्या कानावरती डीवायएसपी विठ्ठल पवार यांनी मॅडमची सूचना घातली. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व एक सक्षम अधिकारी या नात्याने, तत्कालीन जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी, पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची मागणी, जमावाने कोणत्याही प्रकारची पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड केली नसल्याचे कारण दाखवत, मॅडमची मागणी फेटाळून लावली.आखेर त्यादिवशी टोलला टोला हा कोल्हापूरच्या लोकांनी शेवटी लावला.

कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार झाला मात्र आघाडी सरकारमधील प्रति मुख्यमंत्र्याच्या,भूमिकेत असणाऱ्या एका मंत्रीमहोदयांनी, जिल्हादंडाधिकारी श्री आप्पासाहेब धुळाज यांची बदली चा नागपूरला टोला लगावला, तर पोलीस अधीक्षक प्रभारी ज्योतिप्रिया सिंग हिचे मार्फत शहर डीवायएसपी विठ्ठल पवार व पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांच्या वरती निलंबनाचा टोला,लगावला. कोल्हापूरच्या टोल आंदोलनातील हा प्रसंग सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

यात जीवाची पर्वा न करता अनेक जण, रस्त्यावर उतरले होते.अंगावरती कदाचित गुन्हे चढवले जातील, कदाचित लाटी काठी खावे लागतील, वेळप्रसंगी गोळीबार ला सामोरे जाईल,अशा वेळी प्रक्षुब्ध वातावरणामध्ये देखील अनेक जण मावळे म्हणून सिंहासारखे लढत होते. या लढाईमध्ये सर्वांच्या बरोबर श्री सुभाष देशमुख यांच्या पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी, केलेल्या रस्त्यावरच्या लढाईचे कौतुक अनेक जणांनी त्यावेळी केले होते. तद्नंतर टोलविरोधी कृती समितीच्या सत्कार समारंभामध्ये श्री देसाई यांचा मानाने उल्लेख करून त्यांचा सत्कार देखील केला होता.चंदगडच्या बारा हत्तीचे बळ असणाऱ्या "काळकुट" मातीतील,श्री देसाई यांच्यासारख्या रांगडा,चळवळीला पुरून उरणारा हाडाचा कार्यकर्ता,टोलविरोधी आंदोलनाच्या इतिहासामध्ये गडत शाईने लिहिला गेला.

कुटुंबाची चिंता नाही, गरिबीची परवा नाही, मोठमोठ्या उद्योजकांचे पक्षाला,फंडिंग नाही, श्री देसाई यांच्या पक्षाचे जिल्हा भर व्यापलेले कार्यकर्त्यांचे जाळे, यासह अनेक गोष्टी सांभाळण्यासाठी इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणातली ऊर्जा, श्री देसाई यांना कुठून येते हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. श्री देसाई यांची तब्बल 26 वर्षाची राजकीय कारकीर्द, साठा सफळ संपूर्ण,उत्तर!यशस्वीरित्या पूर्णत्वाकडे गेली आहे. चंदगड तालुक्याला काजू आंबा आणि फणसाची राजधानी म्हणून बघितले जाते. फणसाच्या वरच्या काटेरी कौचा सारखे, श्री देसाई यांचे आंदोलनाचे, व्यापक स्वरूप आहे. मात्र त्यांचा स्वभाव हा मृदु असून अतिशय विनम्रपणे ते, हळव्या स्वभावाचे असल्याचे अनेक वेळा प्रसंगातून दिसून आले आहे. न्यायासाठी ते भडकाऊ अनेक वेळा बोलतात.मात्र सामाजिक विकासासाठी, असे बोलले त्यांना काही गैर वाटत नाही. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीमध्ये श्री देसाई यांचे खूप मोठे योगदान, असल्याचे दिसून येते.चंदगड तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी, अनेक वर्षे तेथील" महार वस्तीला" नैसर्गिकरीत्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या तलावाचे पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता.

मात्र श्री देसाई गावाच्या विरोधात जाऊन, पाणी रे पाणी हक्काचे नाही कुणाच्या बापाचे म्हणत, सरकारी प्रशासनाला जाग्यावरती प्रत्यक्ष बोलून घेत तळ्याचा विजय साजरा केला. त्यांचे अनेक आंदोलने ही नुसतीच गाजलेली नाहीतर त्याची दखल जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारला देखील घेणे भाग पडले आहे.

केशव सिताराम ढवळे लिखित सार्थ तुकाराम गाथा, श्री देसाई यांच्या वाचनात आले नंतर त्यांनी ती गाथा, संत तुकारामांचे विषयी अक्षेपआर्य लिखाण असलेने, सदरची गाता रद्द करावी, यासाठी यशस्वीरित्या आंदोलन केले होते, परिणामी वारकरी संप्रदायातील सुमारे दहा हजार लोकांनी श्री देसाई यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी कलेक्टर कचेरी कोल्हापूर येथे मोर्चा काढून अटक करण्याची मागणी केली होती.याप्रकरणी,श्री देसाई यांच्यासह दहा जणांना, काही दिवसांसाठी जेलमध्ये जावे लागले होते. मात्र अखेरीस, एकशे चार वर्षांपूर्वीची ती गाथा शासनाने रद्द करण्याची अधिसूचना काढल्यानंतर, श्री. देसाई यांच्या लढ्याला मिळालेले यश हे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्यातील लढवय्या स्वभावाने खऱ्या अर्थाने चळवळी जिवंत राहिलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या विविध आंदोलनात पैकी काही आंदोलनाची थोडक्यात, मी इथे नोंद घेत आहे. श्री देसाई पदवीधर असून, त्यांचा लोकसंग्रह व प्रशासन वर्ती वचपा दांडगा आहे.श्री, देसाई यांनी वानरर्मारी नावाची, असंघटित जातीतील काही घटकांचे, शासन दरबारी प्रयत्न करून पुनर्वसन, करून देण्यामध्ये श्री देसाई यांचा मोलाचा सहभाग आहे.

बोगस प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या दोन हजार एकर जमिनीची मान्यता रद्द करून शासनाच्या ताब्यात, घेणे पर्यंतचा पाठपुरावा करण्यात आलेल्या यशामध्ये श्री देसाई यांचा सिंहासारखा मोठा वाटा आहे. चंदगड तालुक्यातील बारा पाटलांच्या राजकीय वाटणी मध्ये, हिस्सा न मागता, श्री देसाई यांनी चोकाळलेली आपली वाट, ब्लॅक पॅंथर पक्षाचा जिल्हाभर वाढलेला विस्तार, शहर उपनगर करवीर राधानगरी तालुका पन्हाळा, गगनबावडा, या ठिकाणी पक्षाला मिळत असलेला प्रचंड असा प्रतिसाद, पक्षाच्या ठीक, ठिकाणी वाढलेल्या डौलदार शाखा, पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी व, चळवळीतील जिवंत माणसे जगवण्यासाठी,सदैव तेवत राहणार आहे. श्री देसाई यांचा फोन नेहमी लाईटनिंग कॉल सारखा, सुरू असतो. यामध्ये घरच्या सोयीसुविधा समस्या कमी असतात तर, सामाजिक जातीअंताचा लढा या अन्याय विषयी, सतत खणखणत असतात. कुणा गरिबावर ती शस्त्रक्रिया करावयाचे असेल कुणाचे वैद्यकीय बिल माफ करायचं असेल तर ते नेहमी पुढे असतात. कुणाचे, सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्त करायचे असेल, कुणाला सरकारी बँकेतून कर्ज देता येत नाही म्हणून लाथाडले असेल, कुणा खाजगी फायनान्स वाल्याने बचत गटाला त्रास दिला असेल तर,अशा ठिकाणी श्री सुभाष देसाई हे,अशा नाठाळांच्या माथी, हाणू काठी म्हणत, कधीकधी अशा भंपक "बाबूंना" अंगावर घेण्यास देखील कचरत नाहीत.

गडी मी, चंदगडी असे म्हणत चंदगडच्या काळकुट, मातीतील रांगड्या स्वभावाचा राकट चेहऱ्याचा, चंदगड ऊन बारा हत्तींचे बळ घेऊन आलेले श्री सुभाष देसाई हे जिल्हा प्रशासनास जिल्हा पोलीस प्रशासन व राज्य गुप्तवार्ता विभाग, यांच्या नेहमी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून,नेहमी "रडारवर" असतात. त्यांचे जवळ कायद्याची पदवी नसली तरी, भारतीय संविधान अर्थात इंडियन पिनल कोड, विषयी त्यांचा दांडगा व जवळून अभ्यास आहे. सरकारी प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी,कायद्यावर अभ्यासूपणे बोट ठेवता क्षणी,अनेक अधिकाऱ्यांची भांबेरी उडाल्याचे दिसून आले आहे. याचा फटका एका प्रकरणात,जिल्हा दंडाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील एका, राजपत्रित अधिकाऱ्यांना नाविलाजाने बदली प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे. अनेक जण आज बुद्धाच्या वाटेवर ती जायला निघाले आहेत. सेवानिवृत्तीचा मिळालेला अमाप प्रचंड सा पैसा घेऊन, जन्मदात्या आई वडीलांना गाव गाड्या वरती सोडून, शहर, नगर, उपनगरआवरती टोलेजंग चा बंगला बांधून त्याच्या दारावरती, चित्रविचित्र चपट्या नाकाचे कुत्रे, रखवाली ला ठेवले आहे. एकीकडे अशा कुत्र्यांच्या वरती हजार रुपये खर्च करायचे, त्यांच्यावरची उधळपट्टी करायची, बायकोला साडी महागडी घेताना, नव्याने आलेली चार चाकी गाडी घेताना, लग्न कार्याची निमित्त साधून महागडे, हिरे, जडजवाहीर, सोने-चांदी खरेदी करताना, लाखो रुपयांची उधळपट्टी करताना,मोह माया आणि मस्तीत जगणाऱ्या अशा अनेकांना,बुद्धाच्या वाटेवर जाण्यासाठी आठवड्यातून एकदा, चिंतन शिबीर घ्यावे लागते. बुद्धत्व प्राप्तीसाठी चळवळीत घुसखोरी करणाऱ्या अशा ढोंगी साधुसंतांना, वेळीच हाकलून देण्याची गरज आज चळवळीच, नेतृत्व करणाऱ्या वरती येऊन ठेपली आहे, कारण यांच्यामुळे चळवळीतील" जिवंत माणसे" काळाच्या पडद्याआड झालेली आहेत की काय असा भास समाजाला होऊ लागला आहे. पंचतारांकित जीवन जगणारी माणसे बुद्धत्व प्राप्तीची गाथा वाचून दाखवत आहेत, तर उपाशीपोटी कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या, अशा अनेकांना चळवळीतील जिवंत माणसे, प्रत्यक्ष मदत करताना दिसून येतात. यातील कुणाची शेत जमीन हडप केल्यास, सावकारी कर्जापायी कुणाला किडन्याप केल्यास, सरकार दरबारी उदासीनता दिसून आल्यास, जातीय वादातून बहिष्कृत केल्यास, वैद्यकीय सेवा व शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज भासल्यास, सवर्ण विरोधी दलीत असा विरोधाभास निर्माण झाले, संरक्षण हवे असलेल्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी, अन्यायाचा न्यायीक मार्गे निपटारा करण्यासाठी, साम दाम दंड भेद सर्व नीती वापरून, मदतीसाठी धावून येणारा पहिला हात तो म्हणजे "चळवळीतील जिवंत माणसे" होय. बुद्धत्वाची प्राप्ती ही त्यागातून होते, तर चळवळीतील जिवंत माणसे ही त्यागातूनच पुढे येत असतात. त्यांना श्रीमंत होण्यासाठी आलेले आलेले अनेक सुवर्ण क्षण, या चळवळी पायी त्यातील जिवंत माणसांनी, नाकारलेले आहेत किंबहुना ते, अशा संधीकडे पाठमोर्‍या आकृती ने, नेहमीच चालत असतात. अशा अनेक चळवळीतील जिवंत माणसांपैकी एक, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री सुभाष वैजू देसाई, हे एक आहेत. त्यांनी स्थापन केलेला ब्लॅक पॅंथर पक्ष हा भारतीय निर्वाचन सदन नवी दिल्ली येथे, रीतसर नोंदणीकृत झाला आहे.

आशा जिवंत नेतृत्वाला बळ देण्यासाठी, डॉक्टर सुनील पाटील, विकास चोपडे ,प्रियाताई कांबळे, सौ मालुताई कांबळे, श्री शंकर कांबळे, श्री. संजय बुधगे,श्री.प्रशांत वाघमारे,यांनी, श्री सुभाष देसाई पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, काही दिवस न्यायासाठी जेलची हवा खाल्ली आहे. श्री देसाई यांचे सोबत, मावळे म्हणून, श्री विश्वास कांबळे, दयानंद कांबळे, पुंडलिक नाईक, धोंडीराम कांबळे, दीपाली कांबळे, बाबाराव जैताळ कर, संभाजी लोखंडे, राजू वायदंडे, मोसिन खान, शिवाजी आकोबा कांबळे, केळशीकर, प्रणिती ताई कांबळे शिरगावकर, टी. एस. कांबळे गगनबावडा, रा. रा.जाधव, पी व्ही कांबळे इत्यादींचे अनेक जणांचे जिल्हाभर, पसरलेले जाळे, चळवळी त्या जिवंत नेतृत्वाला उभारी देऊन जातात. श्री देसाई अशा जीवंत चळवळीचे नेतृत्व करतात ही त्यांच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.

.........................................................................

भाग-2 क्रमशा लेखन सुरू आहे.

Updated : 26 July 2020 4:24 AM GMT
Next Story
Share it
Top