Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > चळवळीतली जिवंत माणसं!

चळवळीतली जिवंत माणसं!

चळवळीतली जिवंत माणसं!
X

....................................................

लेखक : श्री. तानाजी सखाराम कांबळे.

........................................................

moba : (8080532937).

email : tanaji kamble33@gmail.com

......................................................................

महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात,एक गाव तिथं बलुतं, आणि दुसरी शहर व उपनगरांमध्ये पेठा.यातली एक लक्षवेधी पेठ आहे, ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील, शहरातील मध्यवर्ती वस्तीत केंद्रस्थान असलेले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावे असलेली ही शिवाजी पेठ. या पेठे चा दरारा इतका आहे की पुण्या, मुंबईपर्यंत शिवाजी पेठ या नावाचा बोलबाला झाल्यास काळजात, "धसका" निर्माण होतो.दोन विरुद्ध विचाराच्या चळवळी या शिवाजी पेठेतून फार पूर्वीपासून हाकल्या गेल्या आहेत. त्यातील एक हिंदुत्ववादी विचारसरणीला धरून असणारी मोट, तर दुसरी ही फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला पोषक असणारी मोठ. शिवाजी पेठतून निर्माण होणार कोणतही आंदोलन असो,

वा पेठेतील झालेला संधीघ्न खून असो, खोड्या करणाऱ्या तोडकर महाराजाला येथील लोकांनी दिलेला चोप असो, घराच्या तुळई वरती चौथ्या पिढीच्या तळपणार्या तलवारी असो, पेठेतील फुटबॉल प्रेमी असो, वा पेठेतील तरुण मंडळ असो, शिवाजी पेठ या ऐतिहासिक पेठेच्या, ऐतिहासिक असा, रंकाळा तलाव पेठेच्या सौंदर्यामध्ये अधिक भर टाकणारा दिसतो.

या शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम मंडळ शेजारी, प्रसाद तरुण मंडळाची इमारत आहे. याठिकाणी फुले-शाहू-आंबेडकर अण्णाभाऊ, यांचे विचार, जोपासत ठेवणारी त्यामध्ये सातत्य ठेवणारी व चळवळ जिवंत ठेवणारी, एक व्यक्ती आहे, ती म्हणजे श्री अमोल जगन्नाथ कुरणे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष. श्री कुरणे यांनी आपले वडील जगन्नाथ कुरणे, यांच्याकडून सामाजिक व पुरोगामी चळवळीच्या विचाराचा वारसा तहहयात सुरू ठेवला आहे. शिवाजी पेठेमध्ये असणाऱ्या दोन विरुद्ध प्रवाहामध्ये आंबेडकरी चळवळीची धार तेवत ठेवणाऱ्यातील,अनेकांपैकी एक श्री अमोल जगन्नाथ कुरणे आहेत. सामाजिक सेवा हा निव्वळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री कुरणे यांनी, तब्बल सोळा वर्षे आंबेडकरी चळवळीच्या विविध महापुरुषांच्या जयंती त्यांचे विचार तेवत ठेवण्याचे काम केले आहे. गरिबांचा दवाखाना, म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे, जिल्हा भरातून व शहर उपनगरातून येणाऱ्या अनेक पेशंटचे हक्काचे "मदतनीस " म्हणून, श्री कुरणे यांचा अतिशय अभिमानाने व गौरवाने उल्लेख होणे गरजेचे आहे. ते स्वभावाने अतिशय विनम्र असून एखाद्या माणसाला लगेच मदत करण्यासाठी त्यांचे दोन हात नेहमी पुढे राहिलेली असतात.

तेही,अगदी निस्वार्थीपणे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एखाद्या, विषयावर ती होणाऱ्या आंदोलनाच्या सुरुवातीला श्री कुरणे, शिवाजी पेठेतून आपला प्रथम पाठिंबा जाहीर करतात व त्याचे निवेदन जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे स्वतः जाऊन सादर करतात, परिणामी अन्यायग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा देखील करतात हे त्यांच्या तिले खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट इथे नमूद करणे गरजेचे वाटते.श्रीमंत माणसाला मदत करण्यासाठी अनेकांचे हात नेहमीच पुढे सरसावलेल असतात,मात्र गोरगरीब, कष्टकरी, पीडित, शोषित, मध्यमवर्गीयांना, निस्वार्थीपणे" हात देणारा" श्री कुरणे यांचा "हात" नेहमीच "अबोल" असा ठरला आहे. अनेक वेळा, वेळ प्रसंगी पदरमोड करून देखील अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांचा मित्रपरिवार खूप दांडगा असून, समाज सुधारणा मध्ये अनेक सामाजिक काम करणाऱ्या उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी,यांना त्यांनी परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने गुणगौरव प्रमाणपत्र देऊन, त्यांचा सत्कार परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या त्यांच्या कामकाजाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी त्यांनी तत्कालीन पोलीस उप अधीक्षक श्री आर आर पाटील तात्या, यांना अनेक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.सध्या ते पुणे पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपाधीक्षक पदावर ती कार्यरत आहेत. (ग्रामीण) तर त्यांच्या परिवर्तन फाऊंडेशनसाठी, ज्येष्ठ विधि तज्ञ, एडवोकेट धनंजय पठाडे, एडवोकेट दत्ताजीराव कवाळे यांचेसह अनेक ज्ञात-अज्ञात विविध थोरामोठ्यांचे नेहमीच पाठबळ लाभले आहे.

..............................................................................

up coming part : 2

next day.

Updated : 25 July 2020 5:36 AM GMT
Next Story
Share it
Top