घाटंजी येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती साजरी
X
घाटंजी येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती साजरी
प्रतिनिधी/कज्जुम कुरेशी
यवतमाळ/घाटंजी : शिंपी समाज संघटना घाटंजी व्दारा संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घाटी घाटंजी येथे समाज मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात शिंपी समाज बांधवांना एकत्र करून सर्व समाजाला एकजुटीने काम करावे हा उद्देश समोर ठेऊन शिंपी समाज बांधवांनी कार्यक्रमात गरजू व्यक्तीना शिलाई मशिन भेट स्वरुपात देण्यात आली. तसेच शासन स्तरावर प्रलंबीत आसणा-या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिलदार मार्फत पाठवीण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरराव दमकोंडवार, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गजबे महाराज (मांडवा) यांनी आपल्या भाषणातून संत नामदेव महाराजांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकले. तालुका शिंपी समाज अध्यक्ष चंदूजी नोमुलवार, माजी अध्यक्ष राजु दिकोंडवार, प्रमुख पाहुणे नारायण गटलेवार, विष्णू माकडवार, केशव सिंगेवार, वसंत वझ्झलवार, शंकर गटलेवार, रवी पोटपेल्लीवार, संतोष दमकोंडवार, सौ. मिनाक्षी पोटपेल्लीवार, सौ. अर्चना गटलेवार, बाळू पोटपल्लीवार, सौ. संगीता संगावार, विलास गटलेवार, ज्ञानेश्वर गटलेवार अशोक गटलेवार, कवडुजी पोटपेल्लीवार, नामदेव कर्नेवार, नारायण पोटपेल्लीवार, नामदेव गटलेवार, बंडूजी बुरेवार, विलास बुरेवार, शंकर बुरेवार, संतोष पोटपिल्लेवार,व समस्त शिंपी समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कर्नेवार, व प्रास्ताविक प्रवीण कर्नेवार, तर आभार संजय दिकोंडवार यांनी मानले.