Home > महाराष्ट्र राज्य > घरकोंबडे झाले ऑनलाईन कोरोना योद्धा

घरकोंबडे झाले ऑनलाईन कोरोना योद्धा

घरकोंबडे झाले ऑनलाईन कोरोना योद्धा
X

लॉकडाऊनमध्ये जनतेकडे फिरवली पाट

बोगस प्रमानपत्राचा वेगळाच थाट

पाठ थोपटून घेण्याचा घातला घाट

के.के.रिपोटर रिसोड

कोरोना महामारी जगामध्ये सर्वत्र लोकांची पाचावर धारण बसवली असताना गेल्या तीन महिन्यापूर्वी कोरोनाला भिऊन घरात बसणारे तरुण, तडफदार व प्रतिष्ठित नागरिक लॉकडाऊनला थोडीसी ढिलाई जिल्यात तसेच पुर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात खुले झाल्यानंतर मात्र कोरोना योद्धा असा ऑनलाइन पुरस्कार स्वीकारत स्वतःचीच शेखी मिरवत अभिनंदन करून घेत आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात काम करणारे पोलिस, डॉक्टर, आरोग्य सेवक हे जवळपास राहिले बाजूला आणि चमकोगिरी करणाऱ्या पोस्टर बॉईज कोरोना योद्धा म्हणून मिरवू लागल्याने नेमका खरा कोरोना योद्धा कोण..? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे.

कोरोनाच्या काळामध्ये कोणतेही कर्तृत्व नसताना एखादी सामाजिक संघटना आर्थिक लालसेपोटी म्हणून पुरस्कार देते याचे भांडवल केले जाते. पुरस्कार मिळालेले सुज्ञ नागरिक लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पाऊल सुद्धा न टाकणारे बरेचसे महाभाग आहेत.त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.याचसोबत लेटर ऑफ ऑनरच्या नावाखाली काही सामाजिक संस्था कोरोना वॉरियर्सच्या नावाने सन्मानपत्रे देत आहेत. हे पुरस्कार वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होण्याबरोबरच फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट करूनही त्यांना टाळ्यांचा भरभराट होत आहे.ऑनलाईन प्रमाणपत्र देणाऱ्या सामाजिक संस्था देखील उदंड झाल्याने सर्वत्र कोरोना योध्ये दिसू लागले आहेत.

याचसोबत समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. ज्यांना सन्मान प्रमाणपत्रे पाठविण्यात आले आहेत. त्यांनी असे काहीही केले नाही असे सांगून हा सन्मान परत केला आहे. मात्र चमकोगिरी करणाऱ्यांनी देखील काहीतरी मर्यादा पाळण्याची गरज निर्माण झाली असून खरे कोरोना योध्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काहीही न करणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी सारासार विवेकबुद्धीचा वापर करून स्वतःहून असा पुरस्कार न स्वीकारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत अर्जुन पाटील यांनी आपले वैयक्तिक विचार असल्याचे कट्ट्यावर दिलखुलास चर्चा केली त्यांना व समाजसेवी केला अधिक बोलते केले असता प्रतिपादन पर ते म्हणाले.

बोगस कोरोना योध्यांनी आत्मपरीक्षण करावे:-

कोरोना महामारीने सर्वांना घाईला आणले असताना बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्या संस्था व बनावट प्रमाणपत्रावर वाहवाह मिळवणाऱ्या समाजसेवकानी जनाची नाही तर किमान मनाची बाळगून असा पुरस्कार स्वीकारताना विचार करावा.डॉक्टर,पोलीस,आरोग्य सेवक हे खरे कोरोना योध्ये आहेत याचे भान ठेवून यांचे खच्चीकरण न होण्यासाठी चमकोगिरी बंद करण्याची नागरिकांतून तसेच पत्रकार प्रेरणादायी कट्ट्यावर संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील खरात तथा(पत्रकार) व तुमच आमचं संपदा वृषाली समाजसेविका यांच्या सह समाजस मागणी करण्यात येत आहे.

Updated : 10 July 2020 5:33 AM GMT
Next Story
Share it
Top