Home > विदर्भ > घरकुल परिसराला उपविभागीय अधिकारी यांची भेट

घरकुल परिसराला उपविभागीय अधिकारी यांची भेट

घरकुल परिसराला उपविभागीय अधिकारी यांची भेट
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

जुनी वस्ती परिसरातील घरकुल कॉलनी परिसरातील तसेच विकास कामांबाबत उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी आढावा घेतला. हिंदू स्मशान भुमि मध्ये केलेल्या विकास कामे, वृक्ष लागवड, शहरातील प्रसिध्द असलेल्या खदानी मध्ये पाणी साठविण्याबाबत व घरकुल कॉलनी मध्ये केलेल्या कामांची पाहणी करुन इतर असलेल्या समस्यांबाबत जाणून घेतले. देवरण रोड वरच्या स्मशान भूमी व घरकुल कॉलनी परिसर मधये ई कलास जमिनीवर झाडे लावण्याचा मानस व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे, कमलाकर गावंडे, नगरसेवक विनायक गुल्हाणे, कैलास महाजन,, नासीरोददीनभाई, न.प.चे अभियंता पोटे साहेब तथा तलाठी राऊत, बेलाडकर हे उपस्थित होते.

मुर्तिजापुर प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन 9850024474

Updated : 24 Nov 2020 7:14 PM GMT
Next Story
Share it
Top