Home > विदर्भ > घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक.

घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक.

घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक.
X

म मराठी न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/ वासीक शेख

यवतमाळ, दि. 21 : शहरातील कच-याची योग्य विल्हेवाट लागावी तसेच शहर स्वच्छ व सुंदर राहावे, याकरीता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, यवतमाळ न.प.चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, यवतमाळ नगर परिषदेच्या कंत्राटानुसार शहरातील सर्व कचरा साफ होण्यासाठी पालिकेने योग्य नियोजन करावे. पालिकेच्या कर्मचा-यांनी कंत्राटदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचे रेकॉर्डींग करणे आवश्यक आहे. कंत्राटदारांचे प्रतिनिधी तसेच त्यांच्याकडील कार्यरत स्टाफच्या नियमित बैठका घ्याव्या. पालिकेने कंत्राटदाराच्या निविदा प्रक्रियेत स्पष्टता ठेवावी. तसेच सध्या कार्यरत कंत्राटदाराने नवीन प्रक्रिया होईपर्यंत काम थांबवू नये. पुढील महिन्यात ही मुदत संपुष्टात येत असली तरी पूर्ण मुदतीपर्यंत काम करावे.

पालिकेच्या मालकीच्या असलेल्या घंटागाड्या सुस्थितीत ठेवाव्या. तसेच शहराच्या कोणत्याही प्रभागातून कच-याची तक्रार येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, आदी निर्देश दिले.

बैठकीला नगर पालिकेचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Updated : 21 Oct 2020 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top