Home > Crime news > ग्राहक बनून आला अन् लाखो रुपयांचे सोने चोरून पळाला 

ग्राहक बनून आला अन् लाखो रुपयांचे सोने चोरून पळाला 

ग्राहक बनून आला अन् लाखो रुपयांचे सोने चोरून पळाला 
X

ग्राहक बनून आला अन लाखो रुपयांचे सोने चोरून पळाला

वाडा:प्रतिनिधी

संजय लांडगे

वाडा शहरातील मुख्य बाजारपेठत असलेल्या एका दुकानात एक भामटा ग्राहक बनून सोने खरेदीसाठी गेला आणि दुकानदारचे लक्ष विचलित होताच लाखो रुपयांचे सोनाच्या दागिने चोरून पसार झाला.

ही घटना बुधवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास घडली आहे.वाडा बस स्थानका जवळ असलेल्या पूजा ज्वेलर्स या दुकानात एक ग्राहक तोंडाला मास्क बांधून आला आणि सोन्याची चैन पसंत केली व सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितले दुकानदार अंगठी घेण्यासाठी वळला असता अतिशय स्फूर्तीने सोन्याचे दोन ट्रे घेऊन पसार झाला.अशी माहिती दुकानाचे मालक मोटाराम यांनी दिली.

सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असल्याची माहिती मोटाराम यांनी दिली आहे.

Updated : 12 Nov 2020 3:57 AM GMT
Next Story
Share it
Top