Home > विदर्भ > ग्राम विकास अधिकारी विजय उईके याची बदली रद्द न करता त्यांना निलंबित करा,

ग्राम विकास अधिकारी विजय उईके याची बदली रद्द न करता त्यांना निलंबित करा,

ग्राम विकास अधिकारी विजय उईके याची बदली रद्द न करता त्यांना निलंबित करा,
X

पंचायत समिती सभापती यांच्या मार्फत आमदार:- संजिवरेड्डी बोदकुरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे मागणी

झरी जामणी :- ग्राम विकास अधिकारी म्हणून विजय उईके हे माथार्जून,पाटण,दाभाळी येथे कार्यरत होते त्याची बदली पं.स.मारेगाव येथे झाली आहे परंतु काही निवडक लोकांच्या सह्या घेऊन संपूर्ण समाज माझ्या पाठीशी आहे असे दाखवून ती बदली रद्द करण्याचा व त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला असताना तसा चौकशी अहवाल दिलेला असुनसुद्धा त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ नये म्हणून काही नागरिकाच्या सह्य घेऊन बदली रद्द करण्याचा व भष्टाचाराचा आरोप दाबण्याचा तन,मन, धनाने कसोशीने प्रयत्न चालू आहे. तसेच त्यांनी स्वतःच्या वाढदिवशी पक्षाच्या मोठे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे असे दर्शवण्यासाठी खूप मोठी जाहिरात दैनिक देशोन्नती दिनांक २८ आगष्ट् रोजी दिली जेणेकरून निलंबनाची कार्यवाही होऊ नये, माथार्जून ग्राम पंचायत येथील चौकशी त्याचावरे ऐक ते चार प्रस्ताव मुख्य कार्यकारी यवतमाळ यांना सादर आहे.

तसेच ग्राम पंचायत पाटण,दाभाळी येथील नागरिकांनी त्याचावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहे व चौकशी ची मागणी करीत आहे. यापूर्वी सुधा श्री.विजय उइके यांनी दि.२८/८/२० ला स्वतःच्या वाढदिवसाला राजकीय पुढाऱ्यां सोबत फोटो लावुन जहिरात दिल्या मुळे ऐक प्रकारे हक्कभंग कारणाने पंचायत समिती सभागृहात त्याचावर चौकशी करून कार्यवाही करण्याचा ठराव मंजूर झाला.अश्या भ्रष्ट वक्तीच्या पाठीशी आदिवासी जनता व इतर समाज कोणताही नाही. मोजक्या लोकांना हाताशी धरून त्यांनी निवेदन दिले आहे. नियमानुसार विजय ऊईके याची बदली रद्द करू नये व नियम अनुसार त्यांचावर ग्रामपंचायत माथार्जून भ्रष्ठाचार केल्या प्रकरणी निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा ईशारा निवेदनात केला आहे या वेळी निवेदन देताना. श्री.माधव आत्राम तंटामुक्ती अध्यक्ष,रमेश आत्राम, माणिक सुरपाम,शिवदास पूर्के, प्रिया भोयर, पोतू टेकाम,प्रभाकर कोडापे,संदीप कुमारे बरेच नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी:-संघर्ष भगत

झरी जामनी-यवतमाळ

Updated : 10 Sep 2020 4:27 AM GMT
Next Story
Share it
Top