Home > विदर्भ > गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची कळंब तालुका युवा अध्यक्ष पदी निवड

गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची कळंब तालुका युवा अध्यक्ष पदी निवड

गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची कळंब तालुका युवा अध्यक्ष पदी निवड
X

गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची कळंब तालुका युवा अध्यक्ष पदी निवड..

रूस्तम शेख/ तालुका प्रतिनिधी

यवतमाळ/ कळंब:अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम यांच्या अध्यक्षते खाली कळंब येथे विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून सभा घेण्यात आली .

या प्रसंगी आदिवासी समाजातील तसेच सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करणारे कळंब येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची आदिवासी विकास परिषद कळंब तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

संघटनेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, संघटनेला बळकट करण्या करिता तसेच संघटनेच्या ध्येय , धोरण, उद्दिष्टेची पूर्तता करण्यास मी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन गौरीनंदन गणेश कन्नाके यांनी केले .

आदिवासी समाजातील ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याचे तसेच उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्या करीता मी सदैव प्रमाणिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित युवा तालुकाध्यक्ष गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांनी व्यक्त केली.

युवा तालुकाध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष नरेश भाऊ गेडाम , जिल्हाकार्यध्यक्ष प्रकाश नाटकर ,मारुती जुमनाके , जिल्हामहासचिव तुषार आत्राम , बंडु कुमरे, जिल्हा सल्लागार एम जे कोडापे ,कळंबतालुका अध्यक्ष अमोल मेश्राम इत्यादीं मान्यवरांचे गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांनी आभार व्यक्त केले .

गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची युवा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्या मुळे समाजातील उपेक्षीत घटकाला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे..

गौरीनंदन उर्फ गणेश कन्नाके यांची युवा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रुस्तम शेख , गणेश मडावी,शिवम इरपाते, पिखुश कन्नाके , जिवण कोवे ,प्रशांत सोयाम,गजु मडावी,समिर मेश्राम ,रोशन चांदेकर, योगेश मेश्राम इत्यादी कार्यकर्त्यांनी तसेच बहुसंख्य आदिवासी बांधवानी अभिनंदन केले आहे...

Updated : 4 Nov 2020 2:54 PM GMT
Next Story
Share it
Top