Home > विदर्भ > गवळी सेवा फाऊंडेशनचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन

गवळी सेवा फाऊंडेशनचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन

गवळी सेवा फाऊंडेशनचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन
X

हिवरी प्रती,यवतमाळ; देवानंद जाधव ,98 81 139 126

गायवर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये लंपी स्किन त्वचा आजार दुरूस्त करण्यासंदर्भात तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यास सुचना करण्याबाबत. "मा.श्री. जिल्हाधिकारी साहेब" यांना गवळी सेवा फाऊंडेशन यवतमाळ जिल्हातफे निवेदन सादर करण्यात आले.

गाय-म्हैस जनावरांमध्ये लंपी स्किन त्वचा आजार यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दिसून येत असून, त्यामुळे आमच्या गवळी समाज बांधवांजवळ असणाऱ्या गाय-म्हैस जनावरांमध्ये याची लागण मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. त्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडले आहे. या आजारामुळे आमच्या गवळी समाज बांधवाच्या पोटा-पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे.

तरी आपणास विनंती करण्यात येते की,सदर रोग आटोक्यात आणण्याकरिता तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना व या रोगांवर योग्य ते औषधोपचार करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्या व गवळी समाज बांधवांना दििलासा देण्याात यावा.

यावेळी गवळी सेवा फाऊंडेशन यवतमाळ जिल्हाच्या वतीने मा.. विलास भाऊ झेंडेकर , मा. ओमकार भाऊ चेके, मा.नरेश उन्हाळे(गुरूजी), व मा. शाम भाऊ काकडे ( जिल्हाकार्याध्यक्ष) उपस्थित होते.

यवतमाळ; देवानंद जाधव ,98 81 139 126

Updated : 10 Sep 2020 2:20 PM GMT
Next Story
Share it
Top