Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > गर्व से कहो हम सब एक है....

गर्व से कहो हम सब एक है....

गर्व से कहो हम सब एक है....
X

मुर्तीजापुर पोलीस स्टेशन मध्ये सर्व धर्माची शिकवण एकच कार्यक्रम

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी :- भुषण महाजन

अकोला/ मुर्तिजापूर दि. 21/10/2020 :- जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पने व्दारे मुर्तीजापुर पोलीस स्टेशन मध्ये सर्व धर्माची शिकवण एकच कार्यक्रम संपन्न झाला. मूर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार शैलेश शेळके तर प्रमुख म्हणून सर्व धर्माचे धर्म ग्रुप मुफ्ती सफदर साहाब, डॉक्टर रामकृष्ण गावंडे, फास्टर सुनील जामनिक, शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब खांडेकर, मौलाना सदरोद्दीन, मौलाना जकी अहमद, पत्रकार अनवर खान व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. शांतता व जातीय सलोखा वृंध्दिगत व्हावे या उद्देशाने सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मानवता हाच सर्वात मोठा धर्म असुन सर्व मामाच्या लोकांनी माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. शेवटी प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे म्हणून आपल्या जीवनात आपल्या संस्कृतीचे जतन करणे व प्रत्येक धर्माचा पालन करणे एकमेकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ठाणेदार शैलेश शेळके यांनी केले.

व्यासपीठावर उपस्थित प्रत्येक धर्माचे धर्मगुरूंनी मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना. यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले या वेळी संजय नाईक, तस्वर खान, सोहेल शे, शे. अशपाक, सय्यद आसिफ, अमोल भांड, गजानन ठाकरे, वैजनाथ धुळे, गणेश ढोके, नमूवेल इंगळे, अमोल शिरसाठ व इतर धर्माचे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्स पालन करताना उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश जऊळकार यांनी केले.

प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113

Updated : 22 Oct 2020 1:08 AM GMT
Next Story
Share it
Top