Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > गगनबावडा तालुक्यात कडे वाढला पर्यटकांचा ओघ!

गगनबावडा तालुक्यात कडे वाढला पर्यटकांचा ओघ!

गगनबावडा तालुक्यात कडे वाढला पर्यटकांचा ओघ!
X

लेखक.श्री. तानाजी सखाराम कांबळे.

.......................................................................

सह्याद्री पर्वताच्या अतिशय विलोभनीय अशा रांगेमध्ये, कोल्हापूर गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ती वसलेल्या गगनबावडा तालुक्यातील, दर्या डोंगर खोर्यात विभागलेल्या खोरी, धुंदवडे खोरी,गगनबावडा मुख्य राष्ट्रीय महामार्गावरती, रस्त्याशेजारी व जंगल सीमेवरती लागून असणारी गावे, वेगाने सुरू असणाऱ्या पावसामुळे, हिरवीगार झाली आहेत. तर मनाला प्रसन्न करणारे इथले, डोंगररांगातून रस्त्याकडेला उंचच्या उंच वाहत येणारे पाण्याचे नागझरी, वेड्यावाकड्या वळणावर उंचावरून पडणारे पावसाचे पांढरीशुभ्र पाणी, नदी नाले आणि तलावांमध्ये साठवून राहिलेले पाणी, मनाला एक प्रकारची नीरव शांतता देत आहेत. गगनबावडा तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटन हे महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर पेक्षा, खूप विलोभनीय व प्रेक्षणीय आहे. करूळ घाटात शेजारी असणाऱ्या दर्जेदार वळणाच्या सह्याद्री पर्वताच्या रांगा मुळे, गगनबावडा तालुक्याची शान आणि मान, कोकण किनारपट्टीचा उंच प्रभाग आवरती डौलदारपणे फडकत आहे. या सह्याद्री किनारपट्टीच्या उंच रांगा वरती, एक नजरेचा कटाक्ष फिरवला असता, पायी चालत जाण्याचा मोह, हिरव्या शालूने नटलेल्या या डोंगर रांगांमध्ये आवरत नाही. को देतील लघू पाटबंधारे तलाव, वेसरफ, अंदुर येथील तलाव, सर्वाधिक मोठ्या प्रचंड क्षमतेने उभारलेला कुंभी-कासारी मध्यम लघू पाटबंधारे तलाव, या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.

गगनबावडा तालुक्याची खरी ओळख, ही थोर साधू तपस्वी, योगीराज श्री परमपूज्य गगनगिरी महाराज, यांच्या किल्ले गगन गडावरील, स्थितीत आश्रमामध्ये केलेल्या विद्या अभ्यासामुळे, गगनगिरी महाराजांचा किल्ले गगनगड आश्रम खूप सर्वदूर लोकप्रिय झालेला आहे. गगनगिरी महाराज आणि नैसर्गिक व औषध संपत्ती, यांचे खूप मोठी आणि जवळचे नाते होते. निसर्गातील वन औषधी विषयी औषधे विषयी महाराजांना खूप मोठा अनुभव होता. महाराजांच्या कडे येणाऱ्या भक्तगणांची, महाराज पारंपारिक अनादिकाळापासून चालणार चालत आलेल्या नैसर्गिक वन औषधीच्या स्त्रोत याविषयी माहिती देताना आढळून येत होते.

गगनबावडा तालुका हा मुटकेश्वर ते कोदे खोरी, साळवण राष्ट्रीय मार्ग,महामार्ग ते गगनबावडा, गगनबावडा ते धुंदवडे खोरी, असा विभागलेला आहे. 29 महसुली ग्रामपंचायतीचे उत्पन्न असलेला हा तालुका, जंगलाचे वन हद्दी, शेजारी गावात बसला आहे. साळवण कोदे खोरे परिसराकडे जाताना या मध्ये असंडोली लागावी 63 खेड्यांची मालकिन,म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रासाई देवीचे सुप्रसिद्ध असे नवसाला पावणारे मंदिर आहे. याच्या उत्तर बाजूला, तळये, गावी वळताई देवीचे छोटेखानी मंदिर आहे. यातले गावाच्या डोंगर उशाला एक, प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण असे वळताईआई देवी या नावाने यांचे एक मोठे पठार आहे. यावर ताई पठारावरती कोल्हापूर संस्थानचे संस्थानिक श्रीमंत छत्रपती शाहू जी महाराज यांनी, तत्कालीन संस्थान काळाचे वेळी, हत्ती पकडण्यासाठी चे उभारलेले खंदक याठिकाणी बघावयास मिळतात. तर पठारावरील प्रचंड असा विस्तारलेला माळ, या पठाराच्या खाली असणारे हजारो फुटाची खोली, पाहता, याठिकाणी पठाराच्या उंच, अशा शेवटच्या भागात एक शीळा, अर्थात एक प्रचंड मोठा दगड चार लहान दगडाच्या छोट्या आधारावरती, पठाराच्या उताराच्या साईटला, गेल्या अनेक पिढ्या तटस्थपणे उभा राहिला आहे.

या शेळे पाठीमागे ऐतिहासिक वळताई देवीचा, हाताचे शिक्के पहावयास मिळतात. या पठाराच्या शेजारी, ऐतिहासिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी, येते नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या, ठिकाणी भेट दिली होती त्याला पांढऱ्या पाण्याचा तलाव असेच संबोधले जाते. या जंगल परिसरांमध्ये वाघ, बिबट्या, साळींद्र, रान कोंबडा, ससा, रान गवा रेडा, रांगाई डुक्कर, कोल्हा, तरसे, सांबर, भेकर, गेळा, मोर लांडोर, विषारी, आती विषारी साप, अजगर, माकडे वांढरे, घुबडे, इत्यादी सह अनेक वन्यजीव प्राणी येथे दिवसाचे वार सायंकाळचे दिसून येतात. वनविभागाने, शिकारी करणे बाबतचा घातलेले खडक व प्रतिबंधात्मक कायदे, अपवादात्मक परिस्थितीला बाजूला सारून, काही चोरट्या शिकारी करणाऱ्या, हौसे खातर शिकाऱ्यांच्या हातून, येतील वन्यप्राण्यांना टिपले जाते. हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा आणि, जंगल परिसरामध्ये असणारी नीरव शांतता, हिरवळीवर पडणाऱ्या धूसर पावसाचे चित्रण, मनाला वतीने त्याला नीरव शांतता देणारी ठरते. याठिकाणी या परिसरामध्ये सापडणाऱ्या वनऔषधी, वनस्पतीच्या शोधात अनेक भटके तस्कर, या जंगल परिसरामध्ये भटकंती करताना दिवस-रात्र दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने नरक्या, तमालपत्री,सारख्या औषधी वनस्पती ही तस्करी अनेक वेळा, झालेली उघडकीस आली आहे. या जंगल परिसरामध्ये, वन प्रेमिंचा राबता तिन्ही सीझनला फिरत असतो. तर या जंगल परिसरामध्ये अनेक सर्पमित्र, विषारी सापाच्या विषाच्या तस्करीचा प्रीत करण्यासाठी चोरून फिरत असतात. जंगल परिसरातील पारंपरिक लाकूडतोड, वगळता, या जंगलातील परिसराने व परिसरातील शेजारी असणारी गावे, पर्यटकांना नक्कीच मोहिनी घातल्याशिवाय, राहत नाही.

..............................................................................

लेखक. श्री. तानाजी सखाराम कांबळे.

Updated : 29 July 2020 5:49 AM GMT
Next Story
Share it
Top