Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > खेडोपाडी दोन दिवसात नव्हे,तर दोन तासातच लग्न पडताहेत पार

खेडोपाडी दोन दिवसात नव्हे,तर दोन तासातच लग्न पडताहेत पार

खेडोपाडी दोन दिवसात नव्हे,तर दोन तासातच लग्न पडताहेत पार
X

घोडा ना गाडी, आहेर ना माहेर, कमी वेळेत कमी खर्चात शुभ मंगल सावधान

_ ग्रामीण भागामध्ये कमी वेळेत कमी खर्चात कमी लोकसंख्येत अशा पद्धतीने लग्न होत आहेत

सकाळ वृत्तसेवा _ महेंद्र खोंडे

त-हाडी 02 कोरोनाच्या महामारी मध्ये नवरा-नवरीच्या आई-वडिलांना (वरमाय_वरबाप) यांच्या डोक्यावरील खर्चाचा प्रश्न जवळपास संपुष्टात आला आहे. घरामध्ये मुलगा किंवा मुलगी असेल असेल तर त्याचे लग्न कसे करायचे हा प्रश्न आई-वडिलांना सतावत असतो.

मुलाला मुलगी मिळेल का ती चांगली आहे का शिकलेली आहे का नोकरीला आहे का देखणी आहे का असे प्रश्न पडतात तर मुलीच्या आई-वडिलांना असं वाटतं मुलाची परिस्थिती चांगली असावी तो चांगल्या नोकरीला असावा त्याच्या जवळ गाडी बंगला असावा व देखणी असावा अशा अपेक्षा असतात.

अशा परिस्थितीमध्ये मुलगा किंवा मुलगी बघण्यासाठी सहा महिने वर्ष-दोन वर्ष जातात, त्यानंतर कमीत कमी ग्रामीण भागामध्ये मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल तर कमीत कमी अडीच ते चार लाख रुपये खर्च होतात. मुलीच्याही आई-वडिलांचे अडीच ते तीन लाख रुपये खर्च होतात.

अनेक जण मोलमजुरी करून जीवन जगतात, त्यामध्ये मुला मुलीचे लग्न म्हटलं की त्यांना रात्रभर झोप लागत नाही .लग्न कसं करायचं पैसे कुठून आणायचे ह्या विचारात असतात. पैसे नसले की बँकेचे लोन काढायचं, किंवा मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून उसनवारी घ्यायचे, नसेल तर मग सावकाराचा दरवाजा ठोठवायचा, कशीतरी पैशाची जुळणी करून लग्न पार पडायचं. त्यानंतर वर्ष दोन ,तीन वर्षे लग्नाचं कर्ज फेडायचं, कसंतरी लगडा लगड करून संसाराचा गडा हकायचा हे सूत्र सुरूच राहते.

परंतु कोरोणाच्या महामारी मुळे हे सर्व उपात्याप थांबले आहेत ,मुलगा असो किंवा मुलगी असो लग्न मात्र दहा ते वीस ग्रामस्थ घेऊन गुपचूपपणे दोन तासात उरकलं जातंय, लग्न पार पडत असताना पोलिसांची गाडी येते की काय, आरोग्य विभागाची गाडी येते की काय, याची धास्ती मनामध्ये असते त्यामुळे तासा दोन तासांमध्ये लग्न उरकून रिकामे होत आहेत.

तसा एकंदरीत विचार केला तर कोरोणामुळे लग्नात होणारा खर्च बचत होऊ लागला आहे. सध्या लग्नासाठी मंडप, घोडा, फोटोग्राफर, वाजंत्री, जेवणाचा खर्च, कपड्यांचा खर्च बचत होऊ लागला आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये हे शुभमंगल सावधान अनेक ठिकाणी पार पडत आहेत.

चौकट_

पूर्वीच्या काळामध्ये लग्न चहा देऊन पार पडत होते चहा वरती लग्न केलेले नागरिक अजून हि आहेत, लग्नात होणारा खर्च म्हणजे दहा वर्षाची अधोगती, सध्या कोणामुळे लग्नासाठी पूर्वीचे दिवस आलेले आहेत कमी खर्चात कमी वेळेत अनेकजण लग्न उरकतआहेत.

पुनंमचद धनगर

जेष्ठ नागरिक त-हाडी

-----------------------------

कोट _

दरवर्षी लग्नसराईमध्ये फोटोसाठी ऑर्डर मिळायच्या काही ठिकाणी फोटोग्राफर मिळत नव्हते. को रोणामुळे एकाही लग्नाचं भाडं मिळाली नाही, त्यामुळे जगायचं कसं गंभीर प्रश्न आहे. -फोटोग्राफर- ज्ञानेश्वर भामरे त-हाडी

---------------------------------

२, दोन पिढ्या पासून मंडप डेकोरेटर चा माझा व्यवसाय आहे. लग्नसराईमध्ये आम्हाला फुरसत मिळत नसे, परंतु यावर्षी एक हि भाडं मिळालेले नाही_मंडप डेकोरेटर मालक

नाना भामरे त-हाडी (वायरमन)

--------------------------------------

Updated : 11 Jun 2020 5:47 PM GMT
Next Story
Share it
Top