Home > विदर्भ > खा.धानोरकर, माजी मंत्री मोघे व माजी नगराध्यक्ष आरीज बेग यांच्या प्रयत्नाने बंद असलेले पानटपरी सुरू

खा.धानोरकर, माजी मंत्री मोघे व माजी नगराध्यक्ष आरीज बेग यांच्या प्रयत्नाने बंद असलेले पानटपरी सुरू

खा.धानोरकर, माजी मंत्री मोघे व माजी नगराध्यक्ष आरीज बेग यांच्या प्रयत्नाने बंद असलेले पानटपरी सुरू
X

जाकीर हुसैन

आर्णीः बंदीमुळे पानठेला/पानटपरी द्वारे आपला उदरनिर्वाह करणारे छोटे व्यावसायीक आर्थिक अडचणीत आल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची पाळी आली होती. मा.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी माजी मंत्री मा.शिवाजीराव मोघे व माजी नगराध्यक्ष मा.आरीजभाऊ बेग यांच्या उपस्थितीत यवतमाळचे जिल्हाधिकारी मा.एम.देवेंदर सिंह यांच्यासोबत दिनांक २२ जुलै ला याविषयावर बैठक लावून पानटपरी वाल्यांची बिकट परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली व नियमानुसार निर्बंध घालून व्यवसाय सुरू करु देण्याची आग्रही मागणी केली. मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मा.जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी ५ महिन्यापासून बंद असलेले पानटपरी व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी साहेब, बाळूभाऊ धानोरकर, मोघे साहेब, आरीजभाऊ व याकरिता प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आर्णी तालुका पानपट्टी असोसीएशन तर्फे शतशः आभार मानले..!

मो- 9421302699

Updated : 14 Aug 2020 5:20 AM GMT
Next Story
Share it
Top