Home > विदर्भ > खासदार नवनीत रवी राणा यांची चव्हाण कुटुंबियांचे घरी सांत्वना भेट.

खासदार नवनीत रवी राणा यांची चव्हाण कुटुंबियांचे घरी सांत्वना भेट.

खासदार नवनीत रवी राणा यांची चव्हाण कुटुंबियांचे घरी सांत्वना भेट.
X

खासदार नवनीत रवी राणा यांची चव्हाण कुटुंबियांचे घरी सांत्वना भेट.

विदर्भाला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना प्रभात कॉलनी येथील श्री चव्हाण यांचे घरातील विहिरीत त्यांचेच कुटुंबातील चिमुकले बाळ वय केवळ दीड महिना यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला

प्रतिनिधी/सदानंद आ खंडारे

अमरावती : खासदार नवनीत रवी राणा यांची चव्हाण कुटुंबियांचे घरी सांत्वना भेट.

विदर्भाला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना प्रभात कॉलनी येथील श्री चव्हाण यांचे घरातील विहिरीत त्यांचेच कुटुंबातील चिमुकले बाळ वय केवळ दीड महिना यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला...

या घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत रवी यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनास्थळी सुरू असलेला वेदनादायी आक्रोश पाहून खासदार नवनीत रवी राणा यांचे डोळे पाणावले.या घटनेची तीव्र शब्दात निंदा करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस यंत्रणेला दिले.दोषी ना लवकरात लवकर शोधून काढा व त्यांना कठोर शासन करा यात कुठलीही हयगय किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत रवी राणा यांनी केले व आपण चव्हाण कुटुंबियांचे पाठीशी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी पोलीस उपायुक्त श्री शशिकांत सातव,सहायक पोलिस ,सहायक पोलिस आयुक्त श्री भोसले,पोलीस निरीक्षक श्री किशोर शेळके यांनी आज सांयकाळी 6 वाजेपर्यंत दोषींचा छडा लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार नवनीत रवी राणा यांचे समवेत नगरसेविका सुमती ढोके,माजी नगरसेवक विनय नगरकर,जितू शर्मा,दरू भाऊ,विनोद गुहे,चंदा ताई लांडे,मालाताई खुरसुडे,अजय गहेरवार,अजय बोबडे,मंगेश कोकाटे,सचिन सोनोने आदी उपस्थित होते.

Updated : 30 Nov 2020 1:48 PM GMT
Next Story
Share it
Top