Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > खापरवाडा येथे सुधारत कापुस यंत्रणा (BCI) कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खापरवाडा येथे सुधारत कापुस यंत्रणा (BCI) कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खापरवाडा येथे सुधारत कापुस यंत्रणा (BCI) कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 03/11/2020

सुधारत कापुस यंत्रणा (BCI) कडून खापरवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये शेतकऱ्यांना पिकांवर बोंडअळी बाबत माहिती देण्यात आली. तसेच या रोगां पासून आपल्या पिकाचे रक्षण करण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषि सहायक दसरती साहेब, वाडेवाले साहेब, संदीप लांबाडे, कपाशीचा पेरा असणारा शेतकरी वर्ग, B.C.I. प्रकल्पा चे शेत्रप्रवरतक धीरज मोकाशे, निखिल चावरे, सरपंच सौ. शुभांगी सरोदे, उपसरपंच सौ. अनिता गवई, कृषीमित्र शशिकांत सरोदे तथा शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते. कपाशीच्या शेताची पाहणी केली असता. पिंकावर खुप मोठया प्रमाणात बोंड अळी आढळून आली. याप्रसंगी ग्रामपंचायत ने विशेष सभा बोलावून मुंग, उडीद, सोयाबीन आता कपाशी हातची गेली आहे त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. कपाशीच्या शेताचा सर्वे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. असा ठराव घेण्यात आला.

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113

Updated : 3 Nov 2020 6:29 PM GMT
Next Story
Share it
Top