Home > विदर्भ > खडकडोह विभागालाही पिकविम्याचा लाभ द्या # शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

खडकडोह विभागालाही पिकविम्याचा लाभ द्या # शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

खडकडोह विभागालाही पिकविम्याचा लाभ द्या  # शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
X

प्रतिनिधी:-संघर्ष भगत

झरी जामनी :- तालुक्यातील खडकडोह विभागतील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2019-20 कापूस पिकविमा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी दिनांक ७ सप्टेंबरला तहसील कार्यालय झरी येथे तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या कडे निवेदन दिले आहे. सदर विभागात वीस ते पंचवीस गावे येत असून ते सर्व शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. गेल्यावर्षी च्या खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने कापसाचे बोन्डे सडून गेली. संपूर्ण मशागत आणि खर्च करून उत्पन्न झाले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्याचवेळी शेतकऱ्यांनी अर्ज करून पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. परंतु कोणी मोक्यावर आले नाही.

दुसरीकडे मात्र अतिवृष्टी झाली हे मान्य करून शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली. मग पिकविमा कंपनीला अतिवृष्टी झाली हे मान्य नाही का? तालुक्यातील तीन विभाग आला कापूस पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मगएकच हवामान एकच पीकपरिस्थिती असताना ह्या विभागावर अन्याय झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आपल्या स्तरावर अडचणी दूर आम्हालाही लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी जगदीश कापसे, माधवराव उलमाले, सुनील चटप, ज्ञानेश्वर आवारी, निखिल उलमाले, राजू टोंगे यांचे सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 7:22 AM GMT
Next Story
Share it
Top