कोसमी -किसनेलि जंगल परिसरात 05 नक्षलवादी ठार
X
म-मराठी न्युज टिम
प्रतिनिधी/दिवाकर भोयर
गडचिरोली /धानोरा :- आज दिनांक 18/10/2020 ला संध्याकाळी कोरची व धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील कोसमी नंबर ३-किसनेली या गावादरम्यानच्या जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
आज दुपारी सी-६० पथकाचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ५ नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. यात पोलिसांचे कुठलेही नुकसान झाले नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर श्री भाऊसाहेब ढोले सो यांच्या नेतृत्वाखाली सि60 कमांडो नक्षल विरोधात अभियान राबविताना महिनाभरातील ही पहिलीच मोठी यशस्वीकारवाई आहे..
प्रतिनिधी-दिवाकर भोयर
मो.9421660523