Home > विदर्भ > कोविड तपासणी केंद्रावर रुग्णांची हेळसांड

कोविड तपासणी केंद्रावर रुग्णांची हेळसांड

कोविड तपासणी केंद्रावर रुग्णांची हेळसांड
X

मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- जुनी बस्ती, मुर्तिजापुर येथील इंदिरा गांधी नगर परिषद शाळेत असलेल्या कोविड तपासणी केंद्रावर रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. शासनाने याबाबत विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतू या संदर्भात स्थानिक नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक व जाणून-बुजुन दुर्लक्ष करतांना दिसत आहे. इंदिरा गांधी नगर परिषद शाळेत अनेक महिन्यापासून कोरोना ची लागण आहे किंवा नाही याबाबतची तपासणी या ठिकाणी होत आहे. परंतु येथे तपासणी करिता आलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नसल्याने त्रास होत आहे.

नगरपरिषदेचे ज्या संबंधित अधिकारीऱ्यांवर याबाबतची सर्व जबाबदारी आहे. त्यांना याबाबत कुठलीही काळजी नाही. येथे येवून पाहणी करणे सोडाच साधी चक्कर सुद्धा मारत नाही. अशा परिस्थितीत या भागातील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या कोविड केंद्रावरच्या परिसरात गांजर गवताचे प्रमाण वाढले आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शाळेच्या प्रवेशव्दाराच असलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्री आहे. रुग्णांना साधी बसण्याची, पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही. या कारणास्तव तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांमध्ये तसेच नागरिकांमध्ये नगर पालिका प्रशासना बाबत तीव्र रोष निर्माण होत आहे. अशा या कोरोना विषाणूच्या गंभीर समस्येकडे नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ देत नाही.

नगरपरिषदेने या समस्येकडे त्वरीत लक्ष देवून रुग्णांची हेळसांड होऊ न देता त्वरीत सुविधा उपलब्ध कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिला आहे.

Updated : 8 Sep 2020 8:44 PM GMT
Next Story
Share it
Top