Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > कोल्हापुरी मिसळ बसून खाण्यावर पाबंदी लॉकडाऊन चा परिणाम!....

कोल्हापुरी मिसळ बसून खाण्यावर पाबंदी लॉकडाऊन चा परिणाम!....

कोल्हापुरी मिसळ बसून खाण्यावर पाबंदी लॉकडाऊन चा परिणाम!....
X

कोल्हापूर दिनांक 18 तानाजी कांबळे

जगात भारी कोल्हापुरी अशीही, एक पुसटशी ओळख कोल्हापूरला आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरचे, कोल्हापुरी पायतान, कोल्हापूर येथील शिवाजी पेठ, जग प्रसिद्ध असणारे राधानगरी अभयारण्य, इतिहास कालीन गड-किल्ले व सुंदरसे पर्यटन, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासह, जगात जमनी आई अंबाबाई, कोल्हापूर संस्थानचे संस्थान अधिपती, श्रीमंत राजश्री छत्रपती शाहू जी महाराज यांचे भव्य राजगृह, कोल्हापूरला नक्कीच भुरळ पाडणारी आहे. मात्र या बरोबरच एक मात्र गोष्ट नक्की आहे की, कोल्हापूरची, तिखट चवीचे असणारी जगप्रसिद्ध मिसळ, वा अन्य तत्सम खाण्याचे पदार्थ खवय्येगिरी ना हॉटेलमध्ये, बसून खाणे साठी, कोल्हापूर महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जारी केला आहे. जगभर पसरलेल्या महामारी मुळे, covid-19 या संसर्गजन्य महामारी चा सर्वांनी धसका घेतला आहे. कोल्हापूरला वाढत जाणारी रुग्ण संख्या, यावर खबरदारीचा उपाय म्हणून, कोल्हापूर महानगरपालिकेने एक हजार रुपये पासून ते पाच हजार रुपये पर्यंत इतका दंडात्मक कारवाई करण्यात येणे चा आदेश जारी केला आहे. कोल्हापूरकर आजार अंगावर घेतील पण खवय्येगिरी साठी नक्की बाहेर पडतील या एकमेव भीतीपोटी महापालिका प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारून, चमचमीत तिखट चवीची मिसळ खाणार यांच्यावरती, पाळत ठेवण्यासाठी महानगरपालिका कोल्हापूर यांच्या चतुर्थ श्रेणी च्या कर्मचाऱ्यांना नियुक्त केली आहे. यामुळे जग प्रसिद्ध असणारे कोल्हापूर मिसळ आता खवय्यांना बसून खाता येणार नाही .

Updated : 18 Sep 2020 4:09 AM GMT
Next Story
Share it
Top