Home > महाराष्ट्र राज्य > कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे. ना.धनंजय मुंडे यांचे श्री रेणुकामातेला साकडे.

कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे. ना.धनंजय मुंडे यांचे श्री रेणुकामातेला साकडे.

कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे. ना.धनंजय मुंडे यांचे श्री रेणुकामातेला साकडे.
X

कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे. ना.धनंजय मुंडे यांचे श्री रेणुकामातेला साकडे.

श्रीक्ष्रेत्र माहूर/ता.प्र.पदमा गि-हे

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विजया दशमीच्या मुहूर्तावर दि.25 ऑक्टो.रोजी माहूर गडावर हजेरी लावून पायरीवरूनच 'कोरोना व ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे' असे श्री रेणुकामातेला साकडे घातले. यावेळी त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे, मेघराज जाधव व न.पं.चे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांची उपस्थिती होती.

ना. धनंजय मुंडे हे मागील चार (२०१६) वर्षांपासून भगवान गडावर जाण्या ऐवजी विजया दशमीला माहुर गडावर येतात. यावर्षी मात्र शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील मंदिरे अनिश्चित काळासाठी बंद केल्याने त्यांनी सर्वसामान्य भक्तांसारखे पायरीवरूनच मातेची आराधना केली. तिथनं विश्रामगृहावर आल्यावर विविध समस्यांच्या निवेदनाचा त्यांचेवर अक्षरशः पाऊस पडला.त्यात लिंबायत येथील सरपंच रंजना दवने यांनी पुनर्वसित लिंबायत गावला स्मशान भूमिसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे संबंधितास आदेश द्या, किसान ब्रिगेडच्या अविनाश टनमने यांनी माहूर तालुक्यात खरीप पिकांची अतोनात नासाडी झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत मिळवून द्या.तसेच अजयकुमार कंधारे यांनी वाई बाजार येथे रमाई घरकुल योजने अंतर्गत २५ लाभधारकांना घरकुल मंजूर करून निवारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा समावेश आहे. यावेळी विनोद राठोड,बंडू राठोड,अमजद पठाण,अनिल पाटील हडसणी कर,अर्जुन जाधव,भारत शेळके, रामा बोळके, अजित साबळे,शिवाजी मुंडे,मारोती बळे,सुभाष मुरकुटे,श्रीराम कांदे,गोविंद घुगे,राजेंद्र केंद्रे,ज्ञानेश्वर चाटे आदिची उपस्थिती होती.

Updated : 26 Oct 2020 1:41 PM GMT
Next Story
Share it
Top