कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीन फेस शिल्ड चे मोफत वाटप....
M Marathi News Network | 17 Oct 2020 4:51 PM GMT
X
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/वासीक शेख
यवतमाळ,दि.१७ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीने हातगाडी वर रोजगार करणाऱ्या व्यवसायिकांना,भाजी विक्रेते,फळ विक्रेते,पान टपरी चालक, चहा कँटीन चालक, मूर्तिकार बांधव, बँक चे वसुली प्रतिनिधी, न्यायालय परिसरातील टायपिंग व्यवसायिक,लहान व्यवसायिक, तसेच रिक्षा चालक यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, व अनिल हमदापुरे यांच्या हस्ते २००० फेस शिल्ड चे मोफत वाटप करण्यात आले.
समाजासाठी मनसे सदैव कटिबद्ध असून कोरोना काळात मनसेने राबविलेल्या विविध उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून येणाऱ्या काळात ही जनसेवेचे हे व्रत अविरत सुरू राहील असे आश्वासन अनिल हमदापुरे यांनी दिले.
Updated : 17 Oct 2020 4:51 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire