Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > कोरोना आणि आजोबांच्या झाडाचे फळ ?

कोरोना आणि आजोबांच्या झाडाचे फळ ?

कोरोना आणि आजोबांच्या झाडाचे फळ ?
X

कोरोनाच्या विषाणूने जगाला मोठ्या संकटात टाकून मोठी जीवितहानी केली आहे.त्याचं बरोबर न भरून येणारी आर्थिक हानी झाली आहे. कोरोना विषाणूला रोखणारी लस, औषध अजून तयार झाली नाही. पण प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आजोबांनी लावलेल्या झाडांच्या फळांचा फायदा मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे.

मुंबई सारख्या शहरात बाराही महिने अनेक फळ मिळतात. सिजन मध्ये ती मिळताच पण सिजन सोडून फळ खाण्यासाठी पैसे जास्त मोजावे लागतात.झाडे फक्त फळच देत नाही तर वायु प्रदूषण टाळण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळवण्यासाठी झाडे खुप महत्वाची असतात. आणि उन्हाळ्यात आल्हाददायक सावली पण देतात. उन्हाळ्यात झाडाचे महत्व कळते. झाडे लावा झाडे जगवा हे बोलणे खुप सोपी असते.झाडे लावुन त्यांचे रक्षण करणे सोपी नसते. रोपाला लहान मुलासारखे सांभाळावे लागते.ते मोठे झाल्यावर त्यांची काळजी नसते.पण त्याला फळ लागल्यावर ते खाण्यासाठी प्रत्येकाची इच्छा होते. त्या इच्छामुळे लोक चोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. मग झाडाची नाही तर फळाची काळजी घ्यावी लागते.

कोरोनावर मात करण्यासाठी व्हेल्टीलेशन उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला.झाडा पासुन मिळणाऱ्या मोफत ऑक्सिजनची माणसांनी कधीच कदर केली नाही. गांवात किंवा शहरात असणारी झाडे आपल्या बाबांनी लावलीच नाही,तर ती आपल्या आजोबांनी लावलेली आहेत.आपण काय केले तर ते तोडून ओसंड रान केले.

ग्रामीण भाग असो की शहरी भाग यांचे सिमेंट काँक्रीटीकरण मोठया प्रमाणात होत असल्यामुळे झाडांचे कत्तल करण मर्यादेपेक्षा जास्त होत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा नांवा खाली पन्नास वर्षे जुने झालेली झाडे बांधकाम साहित्य व फर्निचर साठी कापल्या जात आहेत. त्यात निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करून नुकसान करणारा मोठा भ्रष्टाचार आहे.ग्रामीण भागात त्यामुळेच मोठा हवामानात बदल होत आहे. तसा तो शहरी भागात ही होत आहे,आठ हजार रुपये स्केयर फूट ते विस बाविस हजार रुपये स्केयर फूट जागेचा भाव मिळत असल्यामुळे जुने झाड हे बिल्डिंगसाठी मोठी अडचण ठरत असतात. म्हणून त्याला जाळणारी, नष्ट होणारी इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे शोभिवंत इमारती त्यात प्लॉट बांधली जातात पण ती माणसाला सुख, शांती समाधान देत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात झाड हे खुप महत्वाचे असते. कारण ते झाडे लावणारे आम्ही नसतो तर आमच्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळ आम्ही खातो. आज आमच्या मुलांना शाळेत कॉलेजमध्ये शिकविल्या जाते.वायु प्रदूषण टाळण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळवण्यासाठी झाडे लावा. प्रत्येक सरकार झाडे लावा,झाडे जगवा यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करते.त्यात झाडे लावण्यासाठी किती आणि प्रचार,प्रसार जाहिरातबाजीवर किती याचा हिशेब घेतला तर हाती काहीच लागत नाही.

शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या जाते झाडे किती महत्वाची भूमिका आपल्या जीवनात पार पडतात.शुद्ध ऑक्सिजन मोफत देतात.त्यांची किंमत तुम्हाला कळणार नाही.ती आजोबांना कळली होती.मग शाळा कॉलेज मधील मुल घरी येऊन विचारतात बाबा तुम्ही आयुष्यात आज पर्यंत किती झाडे लावली?. आपली गावाकडे शेती आहे त्यात तरी कधी झाडे लावली काय?. माझ्या कडेच काय सुरक्षित ठिकाणी नोकरी करणाऱ्या कोणा कडेच यांचे उत्तर नाहीच असणारच.कारण आम्ही झाडे लावलीच नाही लावली ती आमच्या आजोबांनी झाडे लावली आहेत.शेताच्या बांधावर त्या झाडावर अधिकार सांगण्यासाठी दोघे भाऊ मात्र शत्रू सारखे भांडतात. आजोबांनी लावलेल्या झाडेचे फळ खाण्यासाठी जिवघेणा होतो त्यात बांधावरचे झाडच तोडल्या जाते.

शेतकऱ्यांना कधी कोणाला सांगावे लागत नाही.झाडे लावल्याने काय फायदा होतो आणि न लावल्याने किती नुकसान होते.त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात, बांधावर,विहिरी जवळ किंवा झोपडी जवळ आंबा,निंब,बोर,बाभूळ,चिंच ही झाडे लावलेली असतात. ही झाडे शेतकऱ्यांना फळ देतात,सावली,सरपण देतात कायमस्वरूपी काही प्रमाणात उत्पन्न देतात. म्हणूनच झाडे लावणे हे शेतकऱ्यांना नेहमीच फायदेशीर ठरलेली आहेत. आता झाडे नसल्यामुळे पाऊस लवकर पडत नाही. हवामानात मोठा बदल झाला आहे. आता सुरक्षित ठिकाणी नोकरी करणारे उच्चशिक्षित लोक झाडे लावण्याचे महत्व सांगतात.पण स्वता कधी शहरात किंवा स्वतःच्या गावात शेतात झाडे लावत नाही.पण शेतकऱ्यांनी झाडे लावल्यास किती उत्पन्न होईल यांचे मार्गदर्शन करतात.

शेतकऱ्यांनी भविष्यात शेती करायची असेल तर दरवर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे हवामानात खुप बदल होईल.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल असे म्हटल्या जाते.पण शेतीमालाला हमीभाव आणि पिकविमा मिळाला पाहिजे असे कोणी शेतकरी सोडून बोलत,लिहत नाही.एक झाड पन्नास वर्षांत ३५ लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. एक झाड पंधरा लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.एक झाड चाळीस लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते. एक झाड एक वर्षांत तीन किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते. एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान दोन अंशाने कमी करते. एक झाड बारा विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान फर्निचर तयार होते. एका झाडावर शंभर पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या पंचवीस पिढ्या जन्माला येतात. मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते. एक झाड अठरा लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते. एक झाड पन्नास वर्षांत काय काय करते. आणि आपण माणसं काय करतो?. याचा लेखाजोखा मी दरवर्षी मुद्दामच मांडत असतो.त्याची आठवण मला फेसबुक करून देते. कारण मी शेतमजुरांचा मुलगा म्हणून शिक्षण घेऊन शहरात सुरक्षित ठिकाणी नोकरी करतो.पावसाला सुरु झाला कि अन्न धान्य आणि सरपणाची तरतूद कशी करून ठेवावी जुन्या सर्व आठवणी जाग्या होतात.

लिहण्या मागचे कारण हे कि जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल. केवळ शेतकऱ्यांनी व शेतीवर जगणाऱ्यांनी झाडे लावली पाहिजेत.सुरक्षित ठिकाणी नोकरी करणाऱ्यानी मात्र पाचवा,सहावा,सातवा वेतनवाढ घेत राहावे. शेतकऱ्यांना भविष्यातील धोके सांगत राहावे. वायु प्रदूषणामुळे फक्त त्यांचेच नुकसान होणार आहे काय?. तर कधीच नाही. तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना दिसतील. ज्यांच्याकडे पैसा आहे तो सिलेंडर विकत घेऊन जगेल ज्यांच्याकडे नाही तो काय करेल?. कोरोनाने ऑक्सिजनचा सिलेंडरचे महत्व सर्वांनाच कळले असेल ही अपेक्षा आहे.

झाडे लावली तर सर्वाना समान ऑक्सिजन देतात. ते हे म्हणत नाही की हा असंघटित शेतकरी,शेतमजूर, कामगार आहे.आणि तो संघटित कर्मचारी अधिकारी सातवा वेतनधारी आहे. म्हणून जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण सहा महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही. कोणत्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो. तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो. आजोबां पणजोबानी लावलेल्या झाडेचे महत्व आम्हाला कधीच कळले नाही. पण कोणाच्या तरी आजोबांनी लावलेल्या झाडेचे फळ आम्ही खाता हे कोणी नाकारू शकत नाही.राज्य व केंद्र सरकारचे मंत्री म्हणजे राजकीय पक्षाचे लबाड लांडगे नेहमी जाहिरात बाजी करतात एवढे लाख झाडे लावू तेवढे लाख रोपांचे वाटप. दरवर्षी लावले जाणारे रोप कुठे गेली?. झाडे कुठे आहेत जाहिराती मध्येच पैसे संपले.सार्वजनिक वनविभागाच्या झाडाची कत्तली यांनीच केल्या. नांव मात्र आदिवासी यांचे बदनाम होते.

आदिवासी वनविभागाच्या जमिनीत अन्न धान्य पिकवितात व झाडाचे रक्षण करतात. त्यांचा ते धंदा करीत नाही.शहरातील झाडे जवळ जवळ संपल्यात जमा आहेत. ती झाडे आज आपण लावली नाहीत तर भविष्यात आपली नातवंडे आपल्याला विचारतील बाबा फळ कुठे लागतात. झाडे कुठे असतात.म्हणून आंबा,चिंच,बोर,पेरू,निंब,बाभूळ अशी अनेक प्रकारची झाडे आपल्या आजूबाजूला लावा. कारण ती भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत.सर्वच सरकारने केले पाहिजे यांची अपेक्षा ठेऊ नये. राज्य व केंद्र सरकारचे म्हणजेच राजकीय पक्ष नेत्यांचे काम फक्त जाहिराती करणे असते.त्यात त्यांना निधी मिळतो त्या जाहिराती शेतकरी,शेतमजूर कधी वाचतो का?. जाहिराती कोणत्या पेपरमध्ये असतात ते पण पाहत नाही.म्हणजेच झाडे लावा ही योजना कोणासाठी आहे. कालचा सत्ताधारी आजचा विरोधीपक्ष झाला. आजचा सत्ताधारी पुढे विरोधीपक्ष होईल. पण रोप कोणी किती लावले आणि झाडे कुठे मोठी झाली यांचे उतर कोणीच कोणाला विचारणार नाही.परंतु आम्ही शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुल मात्र छातीठोक पणे सांगू शकतो. आजोबांनी लावलेल्या झाडांची फळ आम्ही मोठ्या प्रमाणात होत आहोत.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई.

संदर्भ:- गेल्यावर्षी राज्य सरकारने केलेली जाहिरात सोबत माहिती साठी देत आहे.

Updated : 27 July 2020 6:18 AM GMT
Next Story
Share it
Top