Home > महाराष्ट्र राज्य > कोरोना आजार आहे की बाजार आहे | Corona is the market that is sick

कोरोना आजार आहे की बाजार आहे | Corona is the market that is sick

कोरोना आजार आहे की बाजार आहे | Corona is the market that is sick
X

कोरोनाचे रुग्ण पाझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पाझिटिव्ह हे चालले तरी काय रे .......?

प्रतिनिधी / जावेद पठाण चिमूर, 9158282402

चिमूर :- मध्ये अगोदरच्या काही दिवसांमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना चिमूर शहरात झपाट्याने वाढू लागला सोबतच करोनाबाधितांच्या दगावण्याचे प्रमाणही वाढले आपण या काही महिन्यात चंद्रपुर जिल्ह्यात झाले असल्याचे वृत्त पत्रात वाचत आहो सर्व चंद्रपुर जिल्ह्यातील तालुक्याना मागे टाकत करोनाबाधित रुग्ण संख्या व चिमूर व चंद्रपुर जिल्ह्यात ‘टॉप’ वर पोहोचली आहे चिमूर शहरातील प्रत्येक भागात पसरलेल्या करोना संसर्गाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अक्षरश: प्रयोगशाळा ’च झाली जनता संचारबंदी, स्वयंस्फूर्त जनता संचारबंदी, जीवनावश्यक सेवेच्या वेळांमध्ये बदल, दुकाने बंद व सुरू असे एक ना अनेक प्रयोग झाले मात्र, यश काही पदरी पडले नाही उपाययोजनांच्या भडिमारात रुग्णसंख्या वेगाने वाढली नियंत्रणाच्या नावावर केवळ खेळ मांडल्याचा प्रकार झाला असून.

बाहेरून आलेल्या कोरोना रुग्णान मुळे चिमूर मध्ये कोरोना ची सुरुवात झाली अगोदरच्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या स्थिर होती आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत जात असून सप्टेंबर या महिन्यात खऱ्या अर्थाने रुग्ण संख्या वाढीने वेग धरला तो अद्यापही कायम आहे सुरुवातीच्या काळात संशयितांनी स्वत:हून पुढे येत प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी जनजागृतीचा अभाव व भीतीमुळे लपवाछपवीचे प्रकार केले आजार आणि लक्षणांची माहिती दडवून ठेवली परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ते समोर येत गेले प्रशासनानेही तेव्हा फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही त्यानंतर अत्यंत वेगाने रुग्ण संख्या वाढत गेली सुरूवातीच्या काळात जिल्हा प्रशासन, आरोग्य, नगर परिषद पोलीस या सर्व यंत्रणा हातात हात घालून काम करत असल्याचे चित्र होते पुढील काळात पकड अधिक घट्ट होण्याऐवजी ती सैल झाली काही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात लाठी मारली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनासारखे प्रकार घडले नंतर ते मागे घेण्यात आले, तरी या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगलेच खचून गेले प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी अत्यावश्यक असतांना देखील.

चिमूर नागरिकांचा येन जाणे बाहेर जिल्ह्या बाहेरील असल्याने कोरोनाने चिमूर तालुक्यातील बहुतांश भाग बाधित केला परंतु एक नवलच ज्या व्यक्तीना कोरोना झाला त्या व्यक्ती सुरूवातीला कोरोना पजिटीव् मग काही दिवसांनी निगेटिव्ह असली मेडिकल रिपोर्ट येत असल्याने या कोरोना रोगावर लोकांना संशय येत आहे सुरुवातीला कोरोना रोगाबद्दल भीती इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फेसबुक व्हाट्सएपच्या माध्यमातून पसरविण्यात आल्याने जनसामान्य माणसाच्या मनात कोरोना बद्दल ची भीती निर्माण झाली होती परंतु आता कोरोना झपाट्याने वाढत असला तरी इलेक्ट्रॉनिक मीडिया फेसबुकवर कोरोना रोगाबद्दल कोरोना नाही असल्या प्रकारची मॅसेज व व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आता लोकांच्या मनात भीती दिसत नाही फक्त भीती वाटते ती आपल्या परिवाराना सोडून १४ दिवस बाहेर राहण्याची कारण कोरोना च्या सुरुवातीला ज्या सुविधा पुरविल्या जायच्या त्या आतां मिळत नाही म्हणून लोक सर्दी ताप व खोकला या सारख्या रोगाचे उपचार घरीच करत आहे १४ दिवस कारणटाईन म्हणजे १४ वर्षाचा वनवास असल्याने लोक आपला ईलाज करत नाही ज्या लोकांना सर्दी खोकला ताप या प्रकारचे कोणतेही लक्षणे दिसून येत नाही तोच व्यक्ती कोरोना पझिटिव दिसतो व तोच व्यक्ती काही दिवसात निगेटिव्ह दिसत असल्याने या कोरोना रोगाबद्दल ची भीती लोकाच्या मनात राहिली नाही चिमूर परीसरात कोणी मरण पावला तर तो कोरोंना ने मेला असल्या चर्चा परिसरात होत आहे काही वार्डात एकतरी कोरोना रुग्ण आढळून आला तर त्या परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे हे एक न सुटणारे कोड व तो चर्चेचा विषय आहे.

अंदाजे १८० दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात रुग्ण वाढीचा चढता आलेख कायम होता त्यामुळे टाळेबंदीचा नेमका उपयोग काय झाला ? हा प्रश्न अद्यापही मिळालेला नाही आता तर ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असल्याने चिमूर मधल्या बाजारपेठ गर्दीने गजबजली असून समूह संक्रमणासाठी अधिक पोषक वातावरण तयार झाले आता तर धोका अधिक वाढला असून चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे व चिमूर परिसरातील नागरिकांनीही बेजबाबदार वागणूक प्रशासनाला साथ देत नसल्याने व कोरोना रुग्णाच्या पाझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पाझिटिव्ह येत असल्या मेडिकल रिपोटन ने या कोरोना ची भीती दिसत नसल्याने जिकळे तिकळे शोषलडिस्टन्स फज्जा उडताना दिसत असून कोरोनाचा आजार की बजार अशी चर्चा चिमूर परिसरात होत आहे.

Updated : 12 Sep 2020 6:21 AM GMT
Next Story
Share it
Top