Home > महाराष्ट्र राज्य > कोरोनामुळे जिवंत असतांनाही लोक पडताहेत 'मृत्युमुखी'!

कोरोनामुळे जिवंत असतांनाही लोक पडताहेत 'मृत्युमुखी'!

कोरोनामुळे जिवंत असतांनाही लोक पडताहेत मृत्युमुखी!
X

सैरभैर झालेल्या प्रशासनाकडून होताहेत गंभीर चुका!

जाकीर हुसैन

भारत देश कधी नव्हे ते आज खूप हादरला आहे कोरोनाच्या संकटामुळे आता काय करावं कोणाची मदत घ्यावी या कोरोनाला कसा अटकाव करावा या संदर्भातलं भानच जणू त्यांचं हरपलं आहे सरकार आणि आरोग्य कर्मचारी, प्रशासन, पोलीस इतके सैरभैर झाले आहेत की काय कराव हेच त्यांना सुचेनासं झालं आहे. त्याचं कारणही तसंच आहे कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे मृत्युमुखी पडणार्यांनाही काही सीमा राहिलेली नाही रूग्णांना हुडकून काढावं, त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना काॅरंटाइन करावं की मृत्युमुखी पडलेल्यांची विल्हेवाट लावावी.? एकाच वेळी किती आघाड्यांवर लढावं? आणि कोणाकोणाला पुरे पडावं? त्यामुळेच आता प्रशासनाकडून अनेक चुकाही घडताहेत रूग्णालयात दाखल झालेल्यांची, त्यांना काॅरंटाइन केलेल्यांची आणि रूग्णालयात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याच इतकी आहे की त्यांच्या नोंदी ठेवण्याची त्याकडे लक्ष देण्याचीही फुरसत कर्मचार्यांकडे नाही त्यामुळेच चक्क जिवंत मानसांनाही मृत दाखवण्याच्या भयंकर चुका त्यांच्याकडून होत आहेत अशा प्रकारांची संख्या वाढते आहे पण लोकांचं म्हणणं आहे आधिच आमच्या प्रेमाच्या लोकांना आम्हाला भेटता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही, हे मृत पावले तर त्यांचं अंत्यदर्शनही घेता येत नाही.. आधीच अत्यंत विदारक मनःस्थितीतून जात असताना आमच्या मानसांना ते जिवंत असतांना तुम्ही थेट 'मारुन'च टाकता तेव्हा आम्हाला काय यातना होत असतील याचा तरी विचार करा..

पण प्रशासनाकडे याचं कोणतही उत्तर नाही.

असाच एक प्रसंग मर्सिडिज मारोटो या महिलेवर आला त्यांच्या 84 वर्षे वयाच्या आईला रुग्णालयात दाखल केलं अनेक दिवस त्यांचा त्यांच्या आईशी संपर्क नव्हता रुग्णालयात फोन केल्यावर तिची माहिती कळत होती पण त्यांच्या आईशी त्यांचं बोलन होत नव्हतं एक दिवस त्यांनी रुग्णालयात फोन केला पण त्या रुग्णालयातील कर्मचार्याना त्याची आईच सापडली नाही तिची काही खबरबात कळली नाही रूग्णालयानं शेवटी सांगीतलं तुमची आई टेडोरा कोरोनामुळे मरण पावली आहे! मारोटो यांचं अख्खं घर शोकसागरात बुडालं रडून रडून सगळ्यांचे डोळे सुजले त्यांचे वडिल म्हणजे टेडोरा यांचे पती तर अगदीच सैरभैर झाले त्यांची जणू स्मृतीच गेली एकच प्रश्न ते सारखं विचारत होते? ती कशी काय मला सोडून गेली? तिला त्यावेळी किती यातना झाल्या असतील ? तेव्हा तिच्या जवळ कोणी होतं कि नाही? मला का घरात अडवून ठेवलं? त्यांना सांभाळणं अगदी अशक्य झालं भरीस भर आई गेली हे तर रुग्णालयानं सांगीतलं पण तिचा मृतदेह अजूनही सापडत नव्हता जिथे अंत्यसंस्कार केले जातात तिथे त्यांनी फोन केले पण सगळीकडून नकारघंटा शेवटी दुसर्या दिवशी हाॅस्पिटल कडून नव्हे तर अंत्यसंस्कार केले जातात तिथून त्यांना फोन आला तुमची आई मेली नाही जिवंत आहे तिला दुसर्या वार्डात हलविलं होतं त्यामुळे ती सापडत नव्हती आई जिवंत झाल्याचं ऐकून त्यांना हर्षवायू झाला पण त्याआधी ते सारेच अनेकदा मरणयातनांतून गेले!

Updated : 25 July 2020 9:50 AM GMT
Next Story
Share it
Top