Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > "कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन...."

"कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन...."

कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन....
X

'गावातील स्थानिक जि.प.च्या शाळांवर पालकांचा असणार प्रवेशाचा कल.'

महेंद्र खोंडे,सकाळ वृत्तसेवा.

त-हाडी :- गेल्या काही वर्षांपासून गावागावातील जिल्हा परिषदच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागातील पालकांचा खेड्यातील शाळांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलत गेल्याने व शहरीकरणाचे शैक्षणिक भूत ग्रामीण भागातही पसरल्याने जिल्हा परिषद शाळांना बुरे दिन आले होते.परंतु गेल्या एक दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जाला खाजगी शाळांच्या स्पर्धेत आधुनिकीकरणाची जोड दिल्या जात असल्याने विद्यार्थी प्रवेशाला बळकटी मिळत आली असतांनाच यावर्षीच्या कोरोना संक्रमणाच्या धास्तीने शहरातील शैक्षणिक आवडीला आपोआपच गळती बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.गड्या आपला गाव व आपली गावातली शाळा बरी म्हणत अनेक पालक शहरातील महागड्या शाळांतून विद्यार्थ्याना खाजगी शाळांत टाकण्याच्या मनस्थितीत आले आहे.त्यामळे शैक्षणिक खर्चाला आवर बसण्यासोबतच जिल्हा परिषद शाळातील उपस्थिती वाढण्यालाही मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील पालकात गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना शहरी भागातील खाजगी शाळांत प्रवेश घेण्यावर भर दिला गेल्याचे पहावयास मिळाले आहे.त्यात सिबीएससी शिक्षणप्रणालीतून विद्यार्थी घडावा हा खटाटोप असल्याने महागड्या खाजगी संस्थेत प्रवेश घेण्याकडे हा वर्ग वळल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना तर काही वर्षे विद्यार्थी शोधाशोध करावी लागली. खाजगी शाळांच्या स्पर्धेत या सरकारी शाळा टिकणार नाही अशी अवस्था असतांना गेल्या दोनचार वर्षात याच सरकारी शाळांनी स्पर्धेत उतरून तोडीस तोड उत्तर देत या संकटावर मात केली आहे.सद्या सगळीकडे कोरोना संक्रमनामुळे लॉगडाऊन सुरू असून शाळा सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.एकीकडे शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे.वेगवेगळ्या गावचे व शहरातील सर्व भागातले विद्यार्थी हे एकत्र जमण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या पाल्याना आपआपल्या गावातच जिल्हा परिषद शाळांत परतीचा मार्ग निवडला असल्याचे पहावयास मिळत आहे.

"म्हाताऱ्या आईवडिलांना शहरात पाठवून सुरू होते विद्यार्थ्यांचे शिक्षण."

ग्रामीण भागात शक्यतो शेतकरी व शेतमजुर मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याने शेती पाहून शहरात मुलामुलींना शिक्षणाकरिता घेऊन जाणे जमत नसल्याने आजी आजोबा यांना शहरात स्वतःच्या खोलीत किंवा भाड्याने खोली करून ठेवण्यात आल्याचे कोरोना येण्या अगोदरचे चित्र होते.परंतु सद्या या शिक्षणासाठी शहराकडे आकर्षित झालेल्यांची पाऊले गावाकडे वळली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

०००००००००००००००

Updated : 8 Jun 2020 1:10 PM GMT
Next Story
Share it
Top