Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बंद असलेली बससेवा सुरळीतपणे सुरु करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बंद असलेली बससेवा सुरळीतपणे सुरु करण्याची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बंद असलेली बससेवा सुरळीतपणे सुरु करण्याची मागणी
X

त-हाडी परिसरातील ग्रामस्थ यांच्या मागणी

प्रतिनिधी-त-हाडी

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद मनात घेऊन गेल्या वर्षानुवर्षापासुन लालपरी रोडवर अविरतपणे धावती आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत पाच महीण्यापासुन तिचे चाके थांबलेली होती मात्र गेल्या पंधरवाड्यात आपआपल्या जिल्ह्या अंतर्गत तिला मर्यादितपणे सुरु करण्यात आले होते तर आता मागिल सप्ताहापासुन लालपरीने आता बाह्य जिल्ह्यातही प्रवेश केलेला असुन शिरपूर आगाराची बस आता जळगाव नदुरबार नाशिक, यासह विविध जिल्ह्यातील शहराकडे ती धावू लागलेली आहे.मात्र पाच महीन्या नंतरही तीचे चाके ग्रामीण भागात वळलेले नसुन तालुक्यात ग्रामीण भाग एसटीच्या उत्पनासाठी अग्रक्रमी असल्याने शिरपूर -शाहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत चालू करण्याची मागनी त-हाडी परिसरातील युवकांनी मागणी केली आहे.

की गेल्या पाच महिन्यापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने बससेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.बस बंद असल्याने शेतकऱ्यांना बँकेत जाण्यासाठी गैरसोय होत आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती,वृद्ध नागरिक,आजारी रुग्ण,विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने अतिरिक्त भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे त्वरित ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करून सुरळीत चालू करण्याची मागणी त-हाडी परिसरातील युवकांनी मागणी आहे.

त-हाडी वरूळ भटाणे त-हाडकसबे जळोद अभानपुर, भामपुर या ग्रामीण भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.

Updated : 8 Sep 2020 12:59 AM GMT
Next Story
Share it
Top