के. एन काॅलेज.कारंजा येथे सीड बाॅल व सेल्फी विथ ट्री कार्यक्रमाचे अायोजन
कारंजा प्रतिनिधी दिलीप रोकडे कारंजा: दि बेरार एज्युकेशन सोसायटी अकोला अंतर्गत किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा कार्यक्रमाचे अायोजनयोजना विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक कार्य म्हणून "सीड बॉल" व "सेल्फी विथ ट्री" या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. शासकीय नियमांचे पालन करत हे दोन्ही उपक्रम स्वयंसेवकांनी घरीच्या घरीच पूर्णत्वास आणले.
पावसाळा सुरू होतात दरवर्षीच मोठ्या उत्साहात रा.से.यो विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतात. यावर्षी सुद्धा किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'सीड बाँल' तयार करण्यात आले, ज्यामध्ये स्वयंसेवकांनी परिसरातील पडलेल्या बिया गोळा केल्या व त्या बीया मातीमध्ये मिसळून त्यांचे गोळे म्हणजेच 'सीड बॉल' तयार केले. त्यामुळे नैसर्गिक रीत्या वृक्षारोपणाची प्रक्रिया पूर्णत्वास येणार असून या सीड बाँल चे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय कोडापे च्या हस्ते विमोचन करण्यात आले. यासोबतच "सेल्फी विथ ट्री" या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करताना फोटो काढत जवळपास १००० वृक्षारोपण केले आहे.
सदर उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय कोडापे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किरण वाघमारे, रा.से.यो. महिला कार्यक्रम अधिकारी नीलम छंगाणी यांच्या मार्गदर्शनात सर्व रा.से.यो स्वयंसेवकांनी उपक्रम पार पाडले.