Home > महाराष्ट्र राज्य > केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत तांदुळ व डाळ त्वरीत वाटप करावे

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत तांदुळ व डाळ त्वरीत वाटप करावे

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत तांदुळ व डाळ त्वरीत वाटप करावे
X

महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एफ.एम खान उर्फ मुन्नाभाई यांचे तहसिलदारांना निवेदन

जाकीर हुसैन (बीड):- कोरोना (कोविड-19) या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. हा आजार भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पसरु लागला आहे. गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्या कारणाने सर्व सामान्य नागरीकांचे रोजगार बंद पडले आहेत. बीड शहरातील बालेपीर भागातील रहिवाशी असलेल्या गरीब 86 कुटूंबातील 290 व्यक्तींना केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार मोफत धान्य तात्काळ देण्यात यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष एफ.एम खान उर्फ मुन्नाभाई यांनी तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार मोफत धान्य सर्व गरीब कुटूंबांना त्या-त्या राशन दुकाना मार्फत वितरीत करावे असे आदेश असतांना अद्याप पर्यंत बीड शहरातील बालेपीर भागातील वाहेद नगर, भारत नगर, रोशनपुरा, चाऊस नगर, गोरे वस्ती आणि अमराई या भागातील एकुण 86 कुटूंबातील 290 नागरीकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. यावर आवाज उठवत महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष एफ.एम खान उर्फ मुन्नाभाई यांनी तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. सदरील 86 कुटूंबातील व्यक्तींचे आधार कार्ड व तत्सम भागातील राशन दुकानदार यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे सादर केली आहे. या योजनेचा गरजूंना लाभ देण्यासाठी राशन दुकानदार हा महत्वाचा दुवा आहे. परंतु राशन दुकानदार या योजनेचा लाभ देण्यासाठी फारशी उत्स्तुकता दाखवत नाही. त्यामुळे गरजवंतांना लॉकडाऊनच्या झळा सोसाव्या लागत आहे. एकतर हाताला काम नाही आणि कुटूंबातील व्यक्तींना जगवायचे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तरी तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांनी संबंधीत राशन दुकानदाराला तात्काळ धान्य वितरीत करणे बाबत आदेश द्यावेत. तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड यांनीही केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरवंताना देण्यासाठी संबंधीत प्रशासनास आदेशीत करावे अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष एफ.एम खान उर्फ मुन्नाभाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Updated : 18 Jun 2020 6:13 PM GMT
Next Story
Share it
Top