Home > विदर्भ > " कॅनलच्या.." पाण्यामुळे पांदन रस्ते झाले बेकार

" कॅनलच्या.." पाण्यामुळे पांदन रस्ते झाले बेकार

 कॅनलच्या.. पाण्यामुळे पांदन रस्ते झाले बेकार
X

" कॅनलच्या.." पाण्यामुळे पांदन रस्ते झाले बेकार

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/संजय कारवटकर

यवतमाळ/राळेगाव : तालुक्यातील धानोरा येथील रोहणी शिवारातील कॅनलच्या पाण्यामुळे पांदन रस्ते पुर्णपणे खराब झाले आहे त्या पांदन रस्त्याने बैलगाडी सुध्दा जावु शकत नाही गुरे ढुरे टोगऱ्याभर फसते व शेतकरी पुर्णपणे हैराण झाले आहे. मात्र कॅनलच्या संबंधित अधिकारी पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे फोन केला असता माझा कडे त्या शिवारातील काम नाही अशा पद्धतीने उतरे मिळतात हे विषेश..

शेतकऱ्याणी शेतातुन माल कशा पद्धतीने घरी ण्यायचा हा प्रश्न पडला आहे, कापूस, सोयाबीन, शेतात पडुन आहे, कॅनलचे काम अधवट केले आहे काम अजून पर्यंत पूर्ण झाले नाही मायनर कॅनलने शेतकऱ्याच्या शेतात पाणी सुध्दा जात नाही आणि ते पाणी पुर्णपणे पांदन रस्त्याने जातात व पांदन रस्ते पुर्णपणे खराब झाले आहे व शेतकरी पुर्णपणे हैराण झाले आहे. तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे..अभी मागणी शेतकर्यांची आहे..

Updated : 19 Nov 2020 4:32 AM GMT
Next Story
Share it
Top