कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुडबण कापूस खरेदीचा पहिल्या दिवशी सर्व गाड्यांना ५८२५ रुपये भाव..
X
कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुडबण कापूस खरेदीचा पहिल्या दिवशी सर्व गाड्यांना ५८२५ रुपये भाव..
C.C.I. खरेदी लवकर चालू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/ पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ / झरी (जामाणी) :- झरी तालूका आदिवासी बहुल तालुका म्हणून नावलौकीक असुन तालुक्यात मुख्य व्यवसाय शेतीच आहे,बहुताश शेतकऱ्यानी कपाशीची पेरणी करुण "पांढर सोन्याच" नगदी पिक शेतकऱ्यान कडून घेतल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती मुकूडबंन C.C.I. खरेदी आज दिनाक १९ नोव्हेंबर २० ला सकाळ पासुनच नोदणी केलेल्या शेतकऱ्यानी आपला कापूस 'पाढर सोन' विक्री करण्यासाठी आले होते . आजच्या पहिल्या दिवशी ५१ गाड्या कापूस विक्रीसाठी आल्या असता प्रती क्विटल ५८२५ रु.पर्यतचा भाव शेतकऱ्याच्या कापसाला मिळाला.यावेळी कृ.उ.बा.समिती सभापती संदिप बुर्रेवार यानी कोरोणा माहामारी लक्षात घेता योग्य नियोजन,दिलेल्या नियमाचे पालन शेतकऱ्यांनी करावे असे आव्हान करण्यात आले. तसेच शेतकऱ्यानी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे, कापूस खरेदीला येतांना ७/१२, आधार कार्ड, बँक पासबुक हे सर्व सत्यप्रत शेतकऱ्यानी आनावे असा सल्ला सुद्धा संदिप बुर्रेवार कृ.ऊ.बा.स. मुकूडबन,सभापती यांनी दिला.
प्रतिनिधी/पुरुषोत्तम गेडाम,
मो . 976388163