कृषि विभागान केली वाड्यातील नुकसानग्रस्त भात पिकांचा पाहणी
X
पालघर:प्रतिनिधी
वाडा तालुक्यातील गावांना शनिवारी (दि.१७)विभागीय कृषि सह संचालक क़ोकण विभाग. ठाणे विकास पाटील यांनी वाडा तालुक्यातील पाली, कळमखांड, ऐनशेत येथील गावांना भेट दिली. सप्टेंबरऑक्टोबर २०२९ मध्ये अवेळी पडलेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पाली.ता.वाडा येथील शेतकरी.जानु भास्कर मिसाळ, कळमखांड येथील शेतकरी .गजानन पाटील, हरीशचंद्र पाटील यांच्या शेतात कृषि विभागाच्या टिमसह प्रत्यक्ष हजर राहून झालेल्या पीक नुकसानीची पहाणी केली व कृषि विभाग वाडा येथील अधिकारी, कर्मचारी यांना नुकसान झालेल्या पीक क्षेत्राचे पंचनामे करणे बाबत सुचना दिल्या त्या नंतर ऐनशेत येथील शेततळे व पॅक हाऊस ची तपासणी करून दौऱ्याचे वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना तांत्रीक मार्गदर्शन करण्यात आले सदर दौऱ्याचे वेळी मंडळ कृषि अधिकारी गोर्हे एस.पि.इंगळे, कृषि पर्यवेक्षक पिंपळे, जगताप, किरकिरे, कृषि सहाय्यक बेलकर. साबळे,उमवणे,साबळे व विमा कंपनी प्रतिनीधी -ठाकरे उपस्थित होते.