कुसूंबा-रावेर रस्त्याची दुरावस्था गेला; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
X
जळगाव जिल्हा:प्रतिनिधी
हमीद तडवी
रावेर तालुक्यातील कुसूंबा ते रावेर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी खडी निघून आल्याने दुचाकी घसरून अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.
संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या मार्गाने नेहमी अवा गमान असते तरीही त्यांच्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष कसे असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कुसूंबा-रावेर रस्त्यावरील मुंजलवादी येथील वळण रस्त्यावरील असलेले अपघात प्रवनक्षेत्र नजरेस पडत नाही का? की जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
तरी संबधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व लोक प्रतिनिधींंनी या कुसूंबा ते रावेर रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिसरातील नागरिकांचे होणारे हाल थांबवावे आणि तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.