Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > कुशाग्र बुद्धिमत्तेचा अतुल्य माणूस!

कुशाग्र बुद्धिमत्तेचा अतुल्य माणूस!

कुशाग्र बुद्धिमत्तेचा अतुल्य माणूस!
X

श्री अजित शशिकांत नरके,सो !

.............................................................

ते कुणासाठी अजित साहेब आहेत, ते कुणासाठी अजित नरके साहेब आहेत, तर ते सर्वांचे साठी कुशाग्र बुद्धिमत्तेचा अवलिया म्हणून, अजित शशिकांत नरके या नावाने परिचित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यवसाया पैकी, प्रथितयश बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख असलेले,श्री अजित नरके जी, आपल्या कामामुळे, जन माणसाशी जोडलेली घट्ट नाळ, वाड्या वस्ती डोंगर-दऱ्या पर्यंतची, रेग आणि रेग बित्तंबातमी लक्षात ठेवणारे, लहानग्या पोरगा पासून ते तरुण कार्यकर्ते पासून समवयस्कर लोकांच्या पर्यंत आपल्या वेगळ्या ठावनीची ओळख निर्माण करणारे, सार्वजनिक जीवनात चेहऱ्यावरती सततच स्मितहास्य, नवीन माणसाशी बोलताना उत्सुकता पूर्वक होणारा सुसंवाद, दुसऱ्या तिसऱ्या शेवटच्या भेटी पर्यंत राहणारी कायमची तोंडात ओळख, राजकारणातून समाजकारण असो वा क्षेत्रीय समस्यांशी निपटारा करण्याचा प्रसंग असो, पडद्यापासून सूत्र हलवणारा अवलिया, म्हणून श्री अजित शशिकांत नरके यांची ओळख,कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक चळवळीमध्ये वेगळ्या धाटणीची ठरलेली आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी पेठ ही जगभर प्रसिद्ध झालेली आहेत. शिवाजी पेठेमध्ये अनेक प्रकारच्या, वैशिष्ट्यपूर्ण वलयामुळे, शिवाजी पेठ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये वेगळे आदराचे स्थान घेऊन जाते! अशा या पेठेमध्ये ग्रामीण भागाचा चेहरा म्हणून, खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीवरच्या माणसाचा आधारस्तंभ म्हणून, दुःखीताला, पीडिताला, शोषित आला,आधार म्हणून,कोल्हापूर शिवाजी पेठ येथील नरके वाडा खूप दूरपर्यंत सर्वदूर परिचित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिश्रीमंत घराण्यापैकी, काही मोजक्या घराण्यातील एक असे, नरके वाडा व त्या वाड्या वरती, पिढ्यानपिढ्या चे नेतृत्व करणारे, नरके कुटुंबीय, आज घडीला ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीचा आधारस्तंभ ठरत आहेत. त्यापैकी लोकप्रिय ठरलेले श्री अजित शशिकांत नरके, यांच्या लोकप्रिय जनसंपरका मुळे,अनेकांना नरके वाडा आपलासा वाटू लागला आहे.

शालेय शिक्षणाचे वेळी, अनेक विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्ग काढणारे कुशाग्र बुद्धिमत्तेचे श्री अजित नरके हे, नेहमीच तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवून, इतरांशी समजूतदार माणसाप्रमाणे सुसंवाद साधताना दिसून येतात. आणि त्यांची नेमकी हीच शैली अनेकांना भावलेली आहे. दिवसाकाठी कमीत कमी, हजार लोकांच्या बरोबर दूरध्वनी वरती ते न चुकता सुसंवाद साधतात तसेच शेकडो लोकांना सकाळी कार्यालयामध्ये भेटण्यासाठी ते वेळ देतात.त्यांचा सुसंवाद पहिल्या भेटीची ओळख ते स्वतःहून करून दिल्यामुळे अनेकांचे ते पहिल्या भेटीतच मने जिंकून जातात. प्रेम आपुलकी आणि सुसंवाद या तीन गोष्टींमुळे ते,कधी कुणासाठी अजित साहेब होतात तर कधी अजित नरके साहेब होतात.

ते स्वतः एक तज्ञ शेतकरी देखील आहेत. शेतीविषयक त्यांना खूप आपुलकी आणि प्रेम आहे. वेगळ्या धाटणीची शेती करणे, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग अंमलात आणणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबियांना शेतीविषयी व शेतीच्या कामाविषयी आवड निर्माण करणे, त्यासाठी कुटुंबियांसोबत शेतीमध्ये कामाला हातभार लावणे यामध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत.ते स्वतः कुंभी कासारी सहकारी बँकेचे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष आहेत.सहकारी बँकेच्या माध्यमातून,

परिसरातील कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना बँकेच्या वित्तीय सहाय्य योजना, देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांचे मोठे भाऊ करवीर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा विधीमंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांच्या बंधूंच्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये, श्री अजित नरके यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील डोंगराळ भागातील वाड्या वस्त्या, या ठिकाणच्या न सुटणाऱ्या समस्या, तेथील अनपेक्षित प्रश्न, डोंगर वाड्यावरचे धनगर समाजाचे प्रश्न, विविध सामाजिक स्तरावरच्या,अडचणी व त्या सोडविण्यासाठी श्री अजित नरके यांनी,अनेक वेळा शेतकरी बांधवांच्या शेताच्या पायवाटा तूडवलेले आहेत.अनेक समस्या ह्या वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीच्या, प्रशासकीय अडचणीमुळे, शेतजमीनचा नीटवारा न झाल्यामुळे, अनेक ठिकाणी त्या प्रलंबित असतात.

काही प्रलंबित समस्यांचा अभ्यास करून, त्या सोडविण्यासाठी, अजित नरके यांनी आपले मोठे बंधू आमदार तत्कालीन, यांच्याकडे पाठपुरावा करून विविध प्रश्न मार्गी लावले होते. तत्कालीन आमदार श्री चंद्रदीप नरके यांनी,अजित नरके यांच्या अभ्यासू पाठपुराव्यामुळे, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांची लक्षवेधी तारांकित प्रश्न व अतारांकित प्रश्नाद्वारे अभ्यासू मांडणी केली होती. यापैकी अनेक प्रश्‍न शेती व शेतीशी निगडित समस्या होते. यापैकी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कुंभी मध्यम लघू प्रकल्प, शेतशिवारातील पिका वरती होणारे, वन्यजीवांचे कडून होणारे आक्रमण व पिकांचे होणारे नुकसान, अनेक शेतकऱ्यांच्या वरती वन्यजीवाकडून झालेले हल्ले, व गंभीर जखमी तसेच मयत झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तत्कालीन आमदार चंद्रदीप यांनी अनेक वेळा नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जोरदार व आक्रमकपणे शासनासमोर,लक्षवेधी सादर केली होती.

या सर्व कामाच्या पाठीमागे सादरीकरण करणारे,

श्री अजित नरके साहेब हे, करवीर विधानसभा मतदार संघातील तमाम वाड्या वस्ती खेड्यापाड्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने,तटस्थपणे व खंबीरपणे अभ्यासू वृत्तीने, प्रसिद्धीच्या मागे न लागता, कार्यरत राहिले होते व आज देखील आहेत.

आपल्या शालेय जीवनामध्ये अनेक विषयात पैकीच्या पैकी मार्क काढणारे श्री नरके, हे आपला बहुमूल्य वेळ व्यक्तिगत जीवनाला खूपच कमी देत असतात.

त्यांच्या चेहऱ्यावर ती नेहमीच स्मितहास्य आपल्याला दिसून येते.आल्या अतीथा मुठभर द्याया ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत.जे जे शक्य होईल ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत करता येईल त्या ठिकाणी ते कोणतीही आश्वासने न देता कार्यरत असतात.रात्री-अपरात्री आपत्तीप्रसंगी देखील एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आल्यास त्यांचा नेहमी फोन चालू असतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिश्रीमंत घराण्यापैकी, काही मोजक्या श्रीमंत घराण्यातील श्री नरके हे एक आहेत. मात्र श्रीमंतीची नशा कधीही त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यातून वागण्यातून कुणालाही दिसून आलेली नाही,वा तशी कधीच दिसणार नाही याची ठाम खात्री त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांना नेहमीच असते. त्यांची ओळख ते आपल्या कामातून बोलण्यातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समोरच्याला, दाखवून देतात. राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा हो हो ना,ना या गोष्टी लोकप्रतिनिधींना बोलावे लागतात त्या पाठीमागे मजबुरी असते, मात्र श्री अजित नरके अशा गोष्टी पासून अनेक वेळा स्वतःला अलिप्त ठेवतात.चांगल्या माणसांना प्रतिनिधित्व देणे वा त्यासाठीचे नियोजन करणे हे देखील जनतेचे काम असते. मात्र आजकाल मटक्याचे बुक्की घेणारे, जुगार खेळणारे, बायाबापड्या वरती वाईट नजर ठेवणारे, अवैध मार्गाने मिळवलेला थोडासा पैसा, जनतेमध्ये रात्री-अपरात्री वाटून स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करणाऱ्या खोट्या, पुढार्‍यांना निवडून देण्यात जनतेला खूप मोठी सहानभूती का वाटते हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.

श्री अजित नरके या सर्वापासून नेहमी स्वतःला लांब ठेवून असतात.श्री.नरके यांनी दोन वेळा आपल्या बंधूंना विधानसभेला जिंकून आणलं, मात्र विधानसभेची लढाई ही हिंसक पद्धतीने, गटातटाचे राजकारण न आणता, जिल्ह्यातील एका राजकीय विद्यापीठाच्या मतदारसंघाचा सारखे खून ,मारामाऱ्या, कार्यकर्त्यांची डोकी फोडणे,अशा कोणत्याही हिंसक गोष्टीला थारा न देता, वैचारिक पद्धतीने विरोधकांना विरोध करतं, दहा वर्षे विधिमंडळाच्या करवीर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

श्री अजित नरके यांच्या अभ्यासू,कुशाग्र तीव्र बुद्धिमत्तेचा माणूस म्हणून, खेड्या पाड्या, वाड्यावरती गाव गाड्या वरच्या माणसाचा "हक्काचा माणूस" म्हणून ओळख तयार झालेली आहे, ते कुणालाही पुसून काढणे आजघडीला शक्य नाही! कदाचित 2024 ला "अजित पर्व" मोठ्या ताकतीने सुरू होऊ शकते!याबाबत मनात शंका बाळगण्याचे काही कारण नाही.

आमचे मित्र तथा गगनबावडा, तालुक्यातील, युवा नेते श्री राजकुमार गावडे सो यांनी, कोल्हापूर येथे समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जन् माणसांच्या सेवे करतात त्यांच्या समस्या सोडवणे करता, उभारलेली आहे.

या कंपनीचे प्रमुख उद्घाटक तथा मान्यवर म्हणून श्री अजित शशिकांत नरके साहेब यांच्या शुभहस्ते आज दिनांक 7 रोजी सकाळी साडेअकरा वाजता, कंपनी कार्यालयाच्या उद्घाटनाचे निमित्ताने श्री नरके सर यांचे आगमन होणार आहे.

या कंपनीच्या वाटचालीस आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा!

तसेच श्री नरके यांचे पाठबळ कंपनीच्या, प्रशासनास नेहमीच राहील असा आशावाद व्यक्त करतो.

...........................................................................

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

मुक्काम पोस्ट असंडोली,

तालुका गगनबावडा,

जिल्हा कोल्हापूर.

फोन नंबर 8080 53 29 37.

Updated : 8 Sep 2020 8:05 AM GMT
Next Story
Share it
Top