कुरुमच्या आठवडी बाजारा मध्ये साचले दुषितपाणी
X
कुरुम ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
----------------------------------------------------------
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन):- मुर्तिजापुर तालुका तसा समस्यांनी ग्रासला असून मुर्तिजापुर तालुक्यात येणारे कुरुम परिसरामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे येथील आठवडी बाजारामध्ये पाणी जमा झाले आहे. या मैदानात साचलेल्या पाण्यामुळे डासांमध्ये वाढ झाली असून घाणेरडा वास येत आहे. याचा सगळा विपरीत परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर पडला असून त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. कुरुम ग्रामपंचायतच्या निष्क्ाळजीपणामुळे मागील 3 वर्षा पासून नागरिकांना विविध समस्यांना तोंड दयावे लागले आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत पंचायत उघडया डोळयाने पाहत आहे.
याबाबत नागरिकांनी बरेचदा ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिली. परंतू त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रामपंचायतला आता तरी जाग येईल का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करित आहे. सन 2018 मध्ये भारीप बहुजन च्या काही कार्यकर्त्यांनी या समस्येबाबत कठोर पावले घेत या आठवडी बाजारातील पाणी मोटर पंप व्दारे काढले. तेव्हा पासून ग्रामपंचायतने याकडे ढुंकून सुध्दा पाहिले नाही. याकारणाने येथील नागरिकां मध्ये ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींबाबत तीव्र रोष निर्माण झाला आहे. 15 हजार लोकसंख्या असलेल्या कुरुम मध्ये दर रविवारी आठवडी बाजार भरत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बाजार तथा सर्वकाही बंद आहे. यामुळे बाजाराच्या चारही बाजूने दुषित पाणी साचले असून सगळीकडे गवतच दिसत आहे. आठवडी बाजाराच्या बाजूने अंगणवाडी, सरकारी दवाखाना, शाळा व आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. विदयार्थ्यां बरोबरच नागरिकांना या सर्व समस्यांना तोंड दयावे लागते. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग सुध्दा याकडे दुर्लक्ष करित आहे.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113