Home > महाराष्ट्र राज्य > कुणीतरी "मेढ्या" असावं घराला!

कुणीतरी "मेढ्या" असावं घराला!

कुणीतरी मेढ्या असावं घराला!
X

असे पुढारी आमचे वैरी भाग - (15)

..............................................................

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

मोबाईल नंबर : 80 80 53 29 37.

...................................................................

घराघरातील प्रत्येकाच्या आईला,

आपलं लेकरू कितीही मोठं झालं तरी तिच्या नजरेत ते लहानच असतं. माणूस लहानाचा मोठा जसजसा होत जातो तसतसा तो आपले स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायला लागतो.

आणि मग हे सगळं करत असताना काही निर्णय चुकत गेले चुकलेत वा चुकून झाले तर,त्या प्रेमळ आईचे पहिले वाक्य कानावर पडते, ते म्हणजे, कुणीतरी "मेढ्या" घराला असावा!

"मेढ्या" हाच प्रमुख माणूस असतो. त्याचा निर्णय हा अंतिम असतो.तो कधीही चुकत नाही आणि चुकला तर त्याला सांभाळून घ्यायचे ही त्याच्याकडे मोठी कला असते. ज्या घराला मेढ्या नसतो अशी अनेक घरे उद्ध्वस्त होताना मी पाहिलेली आहेत त्याचे काही प्रमाणात चटके देखील

आम्ही भोगलेले आहेत.यामध्ये आपलं घर काय गावातील गाव चावडी ची,पंचायत काय,अन तालुक्याचा फौजदार काय? जिथं मेढ्या नाही त्या ठिकाणी,उध्वस्त होणारी यंत्रनाही लोकांना विनाशाकडे नेणारे ठरते.राजकारणातील पुढारी मंडळी सामाजिक स्वास्थ्याचे पालकत्व घेणारे, याठिकाणी मेढ्या म्हणून, उभारलेले असतात. मात्र समाजाचे स्वास्थ्य हे सैरभैर झालेले असताना,त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखी गंभीर बाब, घरचा" मेढ्या" ढासळलल्यासारखी नक्कीच दिसून येते.अशा ना उघड दार देवा,उघड दार देवा म्हणायची आता वेळ आली आहे.

आपल्या घराला मेढ्या नाही असं उद्विग्नपणे, असंतोषाने, सांगणारी ती आई आपल्या लेकराला वारंवार सांगत असते, मात्र त्या प्रश्नांची उकल सोडवताना आज, ते एकच वाक्य व्यवहारचातुर्य आतलं किती महत्त्वाचा आहे, हे समजून घेताना डोळ्याची पापणी तून,अश्रूचा एक तरी थेंब आल्यावाचून राहत नाही. तिच्या मनातील ही खदकत आज वास्तव रुपाने खरोखरच वाहत आहेत. समाजमन असंतोषाने खदखदत आहे.घराघरातील मणे विध्वं साकडे चाललेली आहेत.स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर नेमके काय पदरात पाडून घेतले, याचा हिशेब मागायला लेखक, साहित्यिक,आणि कवींचे हाथ थरथरताना दिसून येत आहेत. अनेक शाहिरांचे कवित्व, काळाच्या ओघात इतिहासजमा झाले आहे.घराचा मेढ्या हा तसा प्रमुख असतो त्याच पद्धतीने राज्याचा कारभार हाकणारा हा देखील तितकाच महत्त्वाचा जबाबदार प्रमुखअसतो.

मात्र,राजकारणातून जन्माला आलेला हा 'मेढ्या" पंचतारांकित सुविधा ने भरलेला,चाललेला दिसतो. राजसत्तेच्या अतिमहत्वकांक्षे पायी यातील प्रत्येक जण स्वार्थाने बरबटलेल्या घरातील मेढ्या दिसून येतो.

जनमानसाच्या मनामनातील खदखद, यांना दिसून येत नाही.मायेचा मोठाले झालेले,लेकरू पदवी खुंटीला टांगून, नोकरी अभावी घरात ताटकळत बसलेला आहे. एकादी परवड म्हणून काय तर दुसर,लग्नाअभावी कधी वाकत वाकत चाललंय देखील समजून येत नाही.घरातून नुकतीच,तरणीताठी सासुरवाशीन झालेली पोर सहा महिने होण्या अगोदरच अंगावरची पिवळी हळद घेऊन कायमची माहेरवाशिन झाल्याची दिसून येते.घरच्या मेढ्यावरती वाढत चाललेला कर्जाचा डोंबाळा,नुसत्या धक्क्याने अंथरुणावरती खेळलेला आहे.दारातून अनेक वेळा येऊन गेलेल्या पांडबा सावकाराच्या बुलेटच्या नुसत्या आवाजाने,त्याच्या काळजात धस्स होत आहे.घरचं रहाटगाडगे (अतिरिक्त कर्जाचे) चालवण्यासाठी वडिलोपार्जित विकलेल्या शेतजमिनी,अनेक श्रीमंत बागायतदारांचे आज मळेच्या मळे फुलवताना दिसून येत आहेत.नुकताच मुंबईहून आलेले कांबळेच्या भाऊमाच पोरगंबर्मुडा टी-शर्ट वरती गल्ली तन आलो ना, बघूना,करू ना,सांगू ना अशा बोलीभाषेत, उत्तर देताना दिसून येत आहे.

त्याच्या बोलण्यात तितकासा दम नसला तरी,

त्याच्या अनेक उत्तरांमधून तो निरुत्तर झाल्याचे दिसून येतो कारण त्याने हे जग डोळ्याने बघितलेले आहे.वास्तवाचे अनेक चटके त्याने भोगलेले आहेत.गरिबी, श्रीमंतीच्या मनामनातील खोटा देखावा त्यांन अतिशय जवळून बघितला आहे. पंचतारांकित जीवन जगणारी माणसे आणि गटारीच्या नाल्यावर ती छोटसं पत्र्याचे घर बांधून जगणारी माणसे,

दररोज मुंनशी पार्टी च्या बांधलेल्या गलीछ आणि घाण अशा संडासात जाणारी माणसे, त्याने डोळ्याने पाहिले आहेत.

ग्राम स्वच्छतेचा फुगा फुटताना अनेक वेळा त्याने याची देही याची डोळा पाहिले आहे.पावसाळा आला की तुडुंब भरणारे गटारे, नाले व रस्त्यावरचे साठलेले गलिच्छ पाणी, बिना ब्रेक ची तुडुंब गर्दीने जाणारी रेल्वे, वेळप्रसंगी त्याच रेल्वेतून जागे अभावी माणसाला ढकलून देणारी,ती कोडग्या मनाची माणसे देखील त्याने पाहिलेली आहेत.पण तो या सार्‍या बाबी, गावी आल्यावरती शेजारच्यांना सांगू शकत नाही.कारण मोठ्या शहराची खोटी प्रतिष्ठा,आणि त्यातून निर्माण झालेले त्याचे व्यक्तिमत्त्व,त्याला नक्कीच पुसून काढायचे नाही!

राज्य चालवणारा "मेढ्या" जिथे ढीला असेल, त्याठिकाणी विकासाच्या नावाने,केवळ अन केवळ गप्पा ऐकण्या पलीकडे काही पदरात पडणार नाही.कारण त्याला बेरोजगारांची कैफियत ऐकायची नाही.माहेरवाशिन झालेल्या लेकर,बाळीची कैफियत ऐकायचे नाही.पैशाअभावी जड झालेल्या वसतार्‍याची कडू बातमी ऐकायची नाही. पिढ्यानपिढ्या घरात अधिक राशीचे धान्याने भरलेली तट्टे, आता रिकामे झालेले त्याला पहावयाचे नाहीत. नेहमीच सणासुदीला लग्नाच्या मंगल कार्याला, घुमणारी मांगाच्या बापूमाची ती भेदक हलगी आता थंडावल्याने त्यांना ती पुन्हा ऐकावयाची नाही. यल्लू आईचा 'जग' घेऊन सगळ्या मुलुक भर फिरणारी ती, जोगतीन,कुढचे,जोशी, नंदीवाले, वासुदेवाचे सोंग घेणारा सोंगाड्या, काळूबाळू चा तमाशा तील मेकअप ने नटलेला तो महाराजा, व तीन तासासाठी महाराणीच्या वेशातील, राजवस्त्र,अंगभर दागिने घालून नटलेली ती,महाराणी,व यांच्या अवतीभवती असणारे काळूबाळू प्रधानजी,यांचं नेहमीच सुस्त आणि निर्ढावलेले पोट आता, अतिशय हलाखीत जगताना त्यांना पहावयाचे नाही.

त्यांना केवळ पाहायचे आहे ते, फक्त आणि फक्त स्वहित व स्वतःच्या कुटुंबीयांची,पिढ्यानपिढ्या साठीची होणारी तरतूद, श्रीमंतीच्या ऐशआराम मध्ये जगण्यासाठी, मुलाच्या विदेशी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, त्याच्या पुढील व्यवसायाकरिता पंचतारांकित हॉटेल काढून देताना, शाळा कॉलेज यांच्या नावावर ती सरकारी भूखंड राजरोसपणे लाटताना, साखर कारखानदारीत ला उसाचा मलिदा खाताना, पांढऱ्या धोट खादीच्या वस्त्रांमध्ये,चेले,चपाटे,चमचे,यांचेकडून नमस्कार, चमत्कार करून घेताना,पिढ्यान पिढ्या साठी राजसत्तेची गादी आपल्या घरातच ठेवताना,त्यांना पहावयाचे आहे.

येणाऱ्या 21 व्या शतकातील नव्या, महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या, राजसत्तेचा प्रतिपालक म्हणून,त्यांना वाट पाहायची आहे.

यासाठी त्यांना अनेकांच्या डोळ्यातील अश्रू, पुसायचे नाहीत.

त्यांच्या उपाशी पोटाला सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचा पत्ता, देऊन रिकामे व्हायचे,त्यांच्या बेरोजगा रीला, रोजगार देतो म्हणून,लाखोंची आकडेवारी देऊन आपल्याच शाळा, मेडिकल कॉलेजात, इंजीनियरिंग, कॉलेज शीका म्हणून प्रोत्साहन द्यायचे.कारण त्यांना माहित आहे की उपाशीपोटी जगणारा माणूस प्रतीक्षा यादीत असतो जगण्या-मरण्याचा लढाईत.

मात्र हे काही खरे नाही पण यात बदल होताना दिसून येत नाही.कारण घरचा मेढ्या, हा ढिम्म पडलेला आहे.

त्याचे कान बधीर झालेले आहेत.काळ रात्रीच्या दिशेने पडणारी पावले अंधारात चाचपडत पडलेली आहेत.कारण घरचा मेढ्याच समुद्राच्या लाटा वरती स्वार झालेला आहे.

कुणाचाही आक्रोश ऐकू न घेण्यासाठीच!

कारण असे पुढारी आमचे वैरी आहेत!

तर त्याला घरचा "मेढ्या" तरी काय करणार?

..................................................

Updated : 8 Sep 2020 8:01 AM GMT
Next Story
Share it
Top